श्रीरामपूर प्रतिनिधी:
अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आजही देशाला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते.
ससाणे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींनी सत्य,अहिंसा व शांतीचा संदेश दिला. आपल्या अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. त्यासाठी त्यांनी असहकार व सत्याग्रह या शस्त्रांचा प्रभावी वापर केला.चले जाव आंदोलन करून ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले. गांधीजींनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीत ग्रामउद्योग, ग्रामस्वराज्य, आरोग्य,पर्यावरण, ग्रामस्वच्छता, सर्वधर्मसमभाव इत्यादी विषयांवर मांडलेली मते आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. त्यांनी देशाला स्वातंत्र्य, समृद्ध आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. म्हणूनच देशाच्या कल्याणातच स्वतःचे हित जाणणाऱ्या या थोर समाज सुधारकास भारताचे राष्ट्रपिता म्हणून गौरवण्यात येते.असेही ते म्हणाले.
याप्रसंगी येथील मेनरोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक आशिष धनवटे, कॉंग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, शंकरराव फरगडे, डॉ. राजेंद्र लोंढे, सुरेश ठूबे, नजीर शेख, सुनील साबळे, रियाजखान पठाण, निलेश भालेराव, नवाज जहागीरदार, बाबा वायदंडे, युनुस पटेल, गणेश काते, योगेश गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

