shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्युत कर्मचारी परिमंडळ स्तरिय भव्य कामगार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा .... शिवाजी घुले!!

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                               

महाराष्ट्र राज्य मागास विद्युत कर्मचारी संघटना बीड यांच्याशी संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन परिमंडळ स्तरीय भव्य कामगार प्रशिक्षण मेळावा केज येते मुक्ताई लॉन्स धारूर रोड केज येथे आयोजित करण्यात आलेला आहे. 





28 जानेवारी 2024 रोजी रविवारी सकाळी साडेदहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत या मेळाव्यात विविध पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत तरी विद्युत कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहून अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान केज तालुका विद्युत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी घुले यांनी केले आहे . केज विद्दुध कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या या मेळाव्यास विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत . या मध्ये मा. संजय घोडके साहेबसाहेब केंद्रीय अध्यक्ष, रोहिदास मस्के कार्यकारी संचालक महापारेषण, सुंदर लटपटे मुख्य अभियंता परिमंडळ लातूर, मिलिंद बनसोडे सचिव सीनियर इंजिनियर बॅकवर्ड क्लास, नवनाथ पोटभरे केंद्रीय उपाध्यक्ष तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी केज  महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या  वतीने शिवाजी घुले , विष्णू तेलंग साहेब,रमाकांत डिकले ,विकास शिंदे, संदीप तांबे, मनोज सोनवणे ,दीपक गायकवाड, जुबेर पठाण, लामतुरे लाइनमन,विशाल गायकवाड,व सर्व सदस्य  कर्मचारीवर्ग यांनी केले आहे.

close