shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या समतावादी विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीच्यावतीने प्रेरणा यात्रेचे आयोजन - शिवाजी साळवे


*चर्मकार संघर्ष समिती आयोजित प्रेरणा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
-------------------------------------------------
*समतावादी महान संत आणि थोर महापुरुषांच्या विचारांची शिकवण या अनुस्वरुप समतेचा प्रचार - प्रसार याकरीता चर्मकार संघर्ष समिती च्या वतीने श्रीरामपूर ते पुणे प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये पुणे (कात्रज) येथील श्री संत शिरोमणी रविदास महाराज मंदिरास भेट, या समवेत प्रवासातील अनेक पवित्र स्थळांवर मनोभावे अभिवादन करण्यात आले.
-----------------------------------------------------

श्रीरामपूर प्रतिनिधी: 
चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली समतेचा प्रचार - प्रसार याकरीता दि. ७ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामपूर ते कात्रज (पुणे) प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्व समाज बांधवांनी सर्वतोपरी जबाबदाऱ्या सांभाळत व स्वतःसह यात्रेकरूंची काळजी घेत ही यात्रा सुलभपणे संपन्न केली. ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. श्रीरामपूरहुन प्रेरणा यात्रेचे प्रस्थान झाले आणि सकाळी ८:३० वा. अहमदनगर मधील अष्टविनायक कॉलनी येथे प्रेरणा यात्रेचे शुभागमन झाले. तेथून अहमदनगर मधील यात्रेकरूंनी या यात्रेत आपला सहभाग नोंदवत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.

पुढे चास येथील श्री प्रवीण केदारे यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या शेतातील संत गुरु रविदास महाराजांच्या मंदिराची पाहणी करून महाराजांना वंदन करण्यासाठी सर्व यात्रीकरू तिथे गेले असता यावेळी शिवाजीराव साळवे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की,
श्री प्रवीण केदारी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही गुरु रविदास महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन व त्यांच्या प्रेमापोटी स्वखर्चाने मंदिराची उभारणी कशी केली आहे, याबाबत थोडक्यात कल्पना देऊन श्री प्रवीण केदारी यांचे कौतुक व अभिनंदनासह आभार मानले. त्यानंतर पुढे पुण्याच्या दिशेने जात असताना वाडेगव्हाण येथील सरपंच, ग्रामस्थ व चर्मकार संघर्ष समितीचे प्रसिद्धीप्रमुख श्री गोकुळदास साळवे यांच्या आग्रहाखातर प्रेरणा यात्रेचे वाडेगव्हाण येथे आगमन होताच सरपंच व मान्यवर ग्रामस्थांनी सर्व यात्रेकरूंचे गुलाबपुष्प देऊन जंगी स्वागत केले. सर्व यात्रेकरू व चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष  शिवाजीराव साळवे यांची तोंड भरून स्तुती केली. त्यानंतर सर्वांचा वाडेगव्हाण येथील ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान करण्यात आला. यासमयी शिवाजीराव साळवे यांनी अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी परंपरा मानवी जीवनाचे आर्थिक, मानसिक व शारीरिक नुकसान कसे करतात हे समजावून सांगत साधुसंतांनी व थोर महापुरुषांनी समाजाला वारंवार आपल्या प्रबोधनातून कसे पटवून दिले व समाज जागृती केली हे सांगितले. 
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांच्या विचारधारेला अनुसरूनच सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले व त्यांनी समता प्रस्थापित करण्याचे कार्य केले. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदास महाराजांचे समतावादी विचार व छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची प्रेरणा घेऊनच राज्यघटना लिहिली. त्यामुळे हाच वसा चर्मकार संघर्ष समिती पुढे नेणार असे आश्वासन देऊन मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्व यात्रेकरूंना वाडेगव्हाणचे सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने उत्तम चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन सर्वांना निरोप देण्यात आला. 

पुढील प्रवासात आपली सामाजिक बांधिलकी जपत सर्व यात्रेकरूंनी भीमा कोरेगांव येथील शौर्य स्तंभाला अभिवादन केले व त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेल्या महार समाजातील वीर बांधवांसमोर नतमस्तक होऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी शिवाजीराव साळवे यांनी भीमा कोरेगांवची शौर्यगाथा सांगून सर्व यात्रेकरूंना भारावून टाकले. 

पुणे येथील कात्रजच्या संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या पावन मंदिरात आल्यानंतर रविदासिया धर्म प्रसारक अध्यक्ष सुखदेव महाराज वाघमारे व अमोल महाराज वाघमारे यांनी सर्व यात्रेकरूंचे आनंदाने स्वागत करून सर्वांचा यथोचित सन्मान केला. तसेच या प्रेरणा यात्रेच्या स्वागता प्रित्यर्थ पुण्यातील चर्मकार समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवून सर्व यात्रेकरूंचे स्वागत करून स्तुती केली. दोघेही रविदासिया धर्म प्रसारक वाघमारे महाराजांनी संत रविदास महाराजांच्या समतावादी विचारांवर प्रवचनपर मनोगत व्यक्त केले. 
त्यावेळी शिवाजीराव साळवे यांनी प्रेरणा यात्रे मागील उद्देश व चर्मकार संघर्ष समितीचे उद्दिष्ट आणि कार्य तसेच भावी काळातील समाजोपयोगी योजना याबद्दल आपले विचार प्रकट केले. सोबतच समाजातील प्रत्येक गाव व शहरातून अशा 
एकापेक्षा एक प्रेरणा यात्रेचे आयोजन करून आपली एकात्मता दर्शवावी असे आवाहन केले. 
संत गुरु रविदास महाराजांना वंदन केल्यानंतर सर्व यात्रेकरूंनी महाप्रसाद ग्रहण केले व अमोल महाराज व सुखदेव महाराज वाघमारे यांचा निरोप घेऊन परतीची वाट धरली. 

ही यात्रा यशस्वी होण्यासाठी संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे, जिल्हा संघटक दिलीप शेंडे, बापूसाहेब देवरे, महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई गायकवाड, सुनंदा शेंडे, शहराध्यक्षा शशिकला झरेकर, राहाता तालुकाध्यक्षा चंद्रकला गायकवाड, प्रसिद्धीप्रमुख गोकुळदास साळवे, उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे,अश्रूजी लोकरे,जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब केदारे, विठ्ठलराव जयकर, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे, युवा प्रदेशाध्यक्ष सुभाष भागवत, युवाध्यक्ष अभिजीत खरात, सल्लागार कारभारी चिंधे, रामकिसन साळवे, अभिजीत शिंदे, नंदकुमार गायकवाड, सुभाष झरेकर, आप्पासाहेब केदारे इ. पदाधिकारी व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close