प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज येथे नमो चषक स्पर्धा मध्ये कबड्डी, खो-खो या खेळाचेआयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केज तालुक्यातील क्रीडा क्षेत्रांमध्ये विविध खेळांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू यांचा सत्कार आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात झाला यावेळी श्री विनोद गुंड हे केज तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील क्रीडा संयोजक म्हणून काम करत आहेत.
श्री. विनोद गुंड हे राष्ट्रीय खेळाडू असून क्रीडा शिक्षक म्हणून काम आहेत तसेच विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून केज तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात शालेय खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शन करत आहे केज तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात विविध स्पर्धेचे आयोजन करणे , प्रशिक्षण शिबिर घेणे ,मार्गदर्शन करून खेळाडू घडवण्याचा काम करत असून त्यांचे अनेक खेळाडू जिल्हास्तर, विभाग, राज्यस्तर स्पर्धेमध्ये खेळत आहेत. यामुळे केज तालुक्यात क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढत असून क्रीडाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम विनोद गुंड हे करत आहेत यामुळे क्रीडा क्षेत्राला चालना भेटत आहे . यामुळे आमदार नमिता ताई मुंदडा यांनी विनोद गुंड क्रीडा संयोजक यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला व क्रीडा श्रेत्रात मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.



