पडस्थळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. विद्या चंद्रकांत बोंगाणे यांची बिनविरोध निवड
इंदापूर:- आज दि. 11 जानेवारी 2024 रोजी मौजे पडस्थळ,ता. इंदापूर या गावच्या उपसरपंच पदी सौ. विद्या चंद्रकांत बोंगाणे यांची एकमताने निवड करण्यात आली. विरोधात एकही फॉर्म नआल्याने ही निवड बिनविरोध झाली. मावळत्या उपसरपंच सपना राजेंद्र बोंगाणे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. ठरल्याप्रमाणे आपल्या सहकारी सदस्यांनाही संधी मिळावी यासाठी त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला होता. पडस्थळ ग्रामपंचायत वरती महिलाराज असून सरपंचा सहित सर्व महिला सदस्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक एम एस यादव यांनी कामकाज पाहिले. यावेळी सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकमेकांना पेढे भरवून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

