डॉक्टर, इंजिनियर प्रमाणे खेळामध्येही खेळाडू आपले करिअर करू लागले - श्रीराज भरणे .
अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव आयोजित आंतरशालीय क्रीडा स्पर्धा व आठवडा बाजाराचे उद्घाटन.
बावडा:
सध्या खेळाडू डॉक्टर, इंजिनियर याप्रमाणे क्रीडा क्षेत्रात नाव कमवून खेळामध्येही आपले करिअर करू लागले आहेत असे मनोगत श्रीराज भरणे यांनी
कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव (ता. इंदापूर) आयोजित आंतरशालीय क्रीडा स्पर्धा व आठवडा बाजाराचा उद्घाटन समारंभ आ. दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे, विश्वस्त शोभाताई घोगरे, मुख्याध्यापक बाळासो गरगडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक छगन पिसे व विविध मान्यवर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत(दि.११) संपन्न झाला यावेळी व्यक्त केले.
तसेच श्रीराज भरणे म्हणाले की, क्रीडा स्पर्धेतील सहभागात जय पराजय असतो. परंतु यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. कबड्डी, खो-खो व कुस्ती मध्ये इंदापूर तालुका एक नंबर वर आहे .सध्या खेळाडू डॉक्टर, इंजिनियर याप्रमाणे क्रीडा क्षेत्रात नाव कमवून खेळामध्येही आपले करिअर करू लागले आहेत. केंद्र शासनाच्या खेलो इंडियामुळे युवकांना क्रीडा मध्ये संधी मिळू लागली आहे. इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातही विकास होत आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे म्हणाले की,खेळातून बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास होतो तसेच आठवडा बाजारातून आपल्या मुलांना व्यवहार ज्ञान तसेच नफा तोटा काढण्याचे जे तंत्र आहे ते अवगत करण्यासाठी आठवडा बाजार भरवला जाणार आहे . आपल्या विद्यालयाचे नाव तालुका, जिल्हास्तरावर आपल्या मुलींनी खो-खो च्या माध्यमातून केले आहे .अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुलानी .एस.एम यांनी केले तर सूत्रसंचालन डोंबे एस .पी. व आभार प्रदर्शन घोगरे .एस.एम यांनी मानले.
श्रीराज भरणे यांनी विद्यार्थी खेळाडूंबरोबर कबड्डी खेळाचा ही आनंद यावेळी घेतला.
----------------------------------------
फोटो ओळ: १)अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव येथील अंतर शालेय क्रीडा स्पर्धा व आठवडा बाजार उद्घाटन करताना मान्यवर.
२)श्रीराज भरणे यांनी विद्यार्थी खेळाडूंबरोबर कबड्डी खेळाचा ही आनंद यावेळी घेतला.

