shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात कॉमर्स मधील करिअर संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन...

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात कॉमर्स मधील करिअर संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन...

इंदापूर:इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय वाणिज्य विभाग यांच्या वतीने कॉमर्स मधील करिअर संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते राजेंद्र डांगी, चार्टर्ड अकाउंटंट पुणे ,तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंकुश आहेर सर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. योगेश खरात यांनी केले यात त्यांनी सांगितले की, वाणिज्य विभागामध्ये पदवी शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असंख्य करिअरच्या संधी उपलब्ध आहेत वेळोवेळी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम राबवत असते विद्यार्थ्यांना त्यातून अनेक संधी मिळत असतात येणारा काळ कॉमर्स मधील विद्यार्थ्यांना चांगला असणार आहे. अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉक्टर अंकुश आहेर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या बऱ्याच टप्प्यावर नवनव्या गोष्टी शिकत असतो. नवीन गोष्टी शिकून यश हमखास मिळत असते. शिकण्यासाठी वयाची अट नसते.विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद द्यावा व या कार्यशाळेतून आपल्याच हवे ते घेऊन आपले ध्येय निश्चित करण्याचा मनोदय पक्का करावा. या प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र डांगी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की स्वप्न पहा त्यासाठी कौशल्यात आत्मसात करा आणि त्याचा पाठपुरावा करा असे केले तर तुमचे स्वप्न सत्यात उतरेल कॉमर्स मध्ये असंख्य करिअर संधी उपलब्ध आहेत त्यासाठी ज्ञान, तांत्रिक कौशल्य, सुप्त कौशल्य, संभाषण कौशल्य व्यवस्थापकीय कौशल्य असल्यास विविध क्षेत्रात व्यक्ती उच्च पदावर जाऊ शकते. त्यांनी सी. ए, एम. बी. ए, सी.एस या क्षेत्रातील सर्व संधी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंकुश आहे सर यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी किर्दक यांनी केले तर आभार प्रा. सोनाली चव्हाण यांनी मानले. प्रथम,द्वितीय व तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील ७६ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय वाणिज्य विभाग यांच्या वतीने कॉमर्स मधील करिअर संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते राजेंद्र डांगी, चार्टर्ड अकाउंटंट पुणे ,तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंकुश आहेर सर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. योगेश खरात यांनी केले यात त्यांनी सांगितले की, वाणिज्य विभागामध्ये पदवी शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असंख्य करिअरच्या संधी उपलब्ध आहेत वेळोवेळी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम राबवत असते विद्यार्थ्यांना त्यातून अनेक संधी मिळत असतात येणारा काळ कॉमर्स मधील विद्यार्थ्यांना चांगला असणार आहे. अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉक्टर अंकुश आहेर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या बऱ्याच टप्प्यावर नवनव्या गोष्टी शिकत असतो. नवीन गोष्टी शिकून यश हमखास मिळत असते. शिकण्यासाठी वयाची अट नसते.विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद द्यावा व या कार्यशाळेतून आपल्याच हवे ते घेऊन आपले ध्येय निश्चित करण्याचा मनोदय पक्का करावा. या प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र डांगी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की स्वप्न पहा त्यासाठी कौशल्यात आत्मसात करा आणि त्याचा पाठपुरावा करा असे केले तर तुमचे स्वप्न सत्यात उतरेल कॉमर्स मध्ये असंख्य करिअर संधी उपलब्ध आहेत त्यासाठी ज्ञान, तांत्रिक कौशल्य, सुप्त कौशल्य, संभाषण कौशल्य व्यवस्थापकीय कौशल्य असल्यास विविध क्षेत्रात व्यक्ती उच्च पदावर जाऊ शकते. त्यांनी सी. ए, एम. बी. ए, सी.एस या क्षेत्रातील सर्व संधी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंकुश आहे सर यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी किर्दक यांनी केले तर आभार प्रा. सोनाली चव्हाण यांनी मानले. प्रथम,द्वितीय व तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील ७६ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
close