shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनोज जरांगे पाटील यांच्या कष्टाला,त्यांच्या त्यागाला मराठा समाज कधीच विसरणार नाही- गणेश धनवडे

मनोज जरांगे पाटील यांच्या कष्टाला,त्यांच्या त्यागाला मराठा समाज कधीच विसरणार नाही- गणेश  धनवडे
इंदापूर:- मी दिव्यांग गणेश पंढरीनाथ धनवडे रा - निमसाखर, (ता - इंदापूर , जि - पुणे ).
मागच्या महिन्यामध्ये मी संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने  मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी एक दिवसासाठी उपोषणाला बसलो होतो त्या उपोषणाला आज यश मिळालं आहे . संपूर्ण मराठा समाजाचा संघर्षाचा लढा आज यशस्वी झाला आहे . यासाठी अपरंपार कष्ट घेतलेला आपल्या मराठा समजाचा वाघ आपला नेता  मनोज जरांगे पाटील यांच्या कष्टाला,त्यांच्या त्यागाला मराठा समाज कधी च विसरणार नाही . त्यांनी स्वतःच्या जीवाची कुटुंबाची कसलीच काळजी न करता निस्वार्थी मनानी ही पावन खिंड लढवली आहे त्यांचे हे ऋण कधीही न फेडता येणारे आहे . संपूर्ण मराठा बांधव आणि भगिनी  गेले कित्येक दिवस स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करत होते त्या संघर्षाला आज फळ मिळालं आहे . सरकारने शेवटी आज मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करत सर्व आद्यादेश दिले आहेत . आज मी माझ्या कडून माझ्या कुटुंबियांकडून माझ्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी कडून सर्व मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे मनापासून खूप आभार मानतो आणि त्यांचे खूप अभिनंदन करतो हा मराठा समाज सदैव तुमचं ऋणी राहील अशी ग्वाही देतो आणि आता आरक्षण तर मिळालं आहे पण मराठा समाजाच्या सर्व मुला मुलींनी खूप अभ्यास करावा शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करावं अशी आशा करतो आणि पुन्हा एकदा मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा बंधू भगिनीचे अभिनंदन करतो
close