एन ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे ७५ प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा .
इंदापूर:- निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे ७५ प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निमसाखर गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ महादेव लक्ष्मण रणवरे यांनी स्वीकारले होते. तर प्रमुख अतिथी माजी सैनिक बाळासाहेब मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे, संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, यशवंत विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे हे प्रमुख मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, भगवानराव रणसिंग, मानसिंग रणवरे, दिलीप माने शामल ताई जाधव, रूपाली ताई रणवरे, तसेच राणी खरात ताई देखील उपस्थित होत्या. त्याचबरोबर गावचे माजी सरपंच गोविंद दिगंबरराव रणवरे, ग्रामपंचायत सदस्य गोरख शेळके, सुदाम भोसले तसेच पोपटराव कारंडे, विद्यालयाचे आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ, महिला भगिनी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे पर्यवेक्षक मधुकर खरात तसेच कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

