------------------
येडेश्वरी साखर कारखान्यावर भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..!!
-------------------
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
येडेश्वरी कारखान्याच्या प्रांगणात ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बाळकृष्ण (बापू ) भवर, त्रिंबक चाटे, बालासाहेब (दादा) बोराडे, नंदू दादा मोराळे, खरेदी विक्री संघाचे संचालक रमेश आबा शिंदे, नारायण आबा शिंदे, माजी पं.स.सदस्य शिवाजी (बंडू) चौधरी,गुंडाप्पा भुसारी, पिंटू (दादा) ठोंबरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालूकाध्यक्षा शितलताई लांडगे, संजीवनीताई देशमुख,शरीफभाई सय्यद सर्व नगरसेवक बाजार समितीचे संचालक, सरपंच, से.सो.चेअरमन, शेतकरी सभासद, वाहतूक ठेकेदार, खाते प्रमुख, कर्मचारी शेतकरी वर्ग, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्थाविक संचालक बाळकृष्ण भवर यांनी केले तर नंदकुमार मोराळे, नारायण आबा शिंदे, डॉ चाटे या मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
बजरंग सोनवणे म्हणाले की, एफआरपी पेक्षा जास्त भाव देणार असून कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ करण्यास प्रयत्न करणार तसेच येणाऱ्या काळात लवकरच कारखाना सी.एन.जी प्रकल्प चालू करणार असे त्यांनी सांगितले त्यामुळे अजून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळेल
चालू हंगामात 2023 - 24 मध्ये दि.२६ जानेवारी २०२४ पर्यंत 5,32000 मेट्रिक टन गाळप पूर्ण झाले असून त्यापासुन 3,10000 क्विंटल साखर उत्पादन झाली आहे. चालू हंगामात आसवांनी प्रकल्पातून 1,53,60,957 लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे. महावितरण कंपनी ला 61,52,400 युनिट वीज विक्री केली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली उचल 2750 रुपये दि. 31/12/2023 पर्यंत बँक खात्यात जमा केली आहे.
तसेच कारखाना ३१ मार्च अखेर पर्यंत चालणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी येडेश्वरी साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी एच.के यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण शिंदे यांनी केले.

