shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राध्यापकांनी संशोधन क्षेञात काम करुन ज्ञान संपादन केले पाहिजेः माजी आ.मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ज्ञानसंपदा वाढीसाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे.वाचन संस्कृतीची कास धरुन विविध छंद जोपासले पाहिजे. शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेञात काम केले पाहिजे,असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॕ.सौ.सुनिताताई मिलिंद गायकवाड यांना पी.एच.डी. मिळाल्याबद्दल अशोक शैक्षणिक संकुल आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी अशोक कारखान्याचे संचालक भाऊसाहेब उंडे, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, भीमराज देवकर, ऍड.मिलिंद गायकवाड, ऍड. डी.आर.पटारे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, अशोक दिवे, बाबुराव गायकवाड,सौ. लतिका गायकवाड, डॉ.महेंद्र गायकवाड, भाऊसाहेब दोंड, प्राचार्य संपतराव देसाई, निमगावखैरीचे सरपंच दत्तात्रय झुराळे आदी उपस्थित होते.
श्री.मुरकुटे म्हणाले की, प्राध्यापकांनी केवळ शिकविण्यात समाधान मानू नये. व्यासंगाव्दारे नवनवीन माहिती प्राप्त करुन ज्ञानवृध्दी केली पाहिजे. विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती शिक्षकच देवू शकतात. त्यामुळे शिक्षकांनी ज्ञान व माहिती मिळवून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
सत्कारास उत्तर देताना डाॕ.सौ. गायकवाड म्हणाल्या की, माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी मला महाविद्यालयात संधी दिली. या संधीमुळे मला आजचा दिवस बघायला मिळाला. तसेच पती अॕड.मिलिंद गायकवाड यांनी प्रेरणा दिली. यामुळे मी येथपर्यंत पोहोचले. मला पी.एच.डी. मिळाल्यामुळे महाविद्यालयाचे नावलौकिकात भर घातल्याचे समाधान वाटते. यापुढील काळात महाविद्यालयाच्या व विद्यार्यांच्या ऊन्नतीसाठी आपण प्रयत्न करु, असे त्या म्हणाल्या. 
याप्रसंगी कारखान्याचे संचालक सोपानराव राऊत, पत्रकार मिलिंदकुमार साळवे, कॉम्रेड श्रीधर आदिक, संचालक विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, माजी संचालक काशिनाथ गोराणे, प्रा.कार्लस साठे, दत्तनगरचे माजी सरपंच पी.एस.निकम सर, रमादेवी धीवर, देवराम वडीतके, रवींद्र पहिलवान, अशोक गायकवाड आदिंनी मनोगत व्यक्त केले. प्रा.पायल सुराणा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*पत्रकार इम्रान एस.शेख श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close