shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१९३ व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाई फुलेंना अभिवादन


*सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आजच्या स्त्रिया स्वातंत्र्य उपभोगत आहेत - आबीद खान

अहमदनगर प्रतिनिधी:
स्त्री शिक्षणाच्या अद्यपर्वतक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त येथील सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.


सावित्रीबाई फुले यांचा वयाच्या नवव्या वर्षी विवाह झाला व त्यांना ज्योतीबा फुले यांनी विवाहानंतर शिक्षण दिले,
त्याच पुढे जाऊन स्त्री शिक्षणाच्या जनक ठरल्या. त्याकाळी स्त्रीयांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन फार संकुचित होता. अशा काळात त्यांनी स्त्रीयांना शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यामुळेच आजच्या स्त्रिया स्वातंत्र्य उपभोगत आहेत, परंतु काय खर्‍या अर्थाने स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजामध्ये खरोखरच बदलाल आहे का?

हा विचार समाजातील प्रत्येकाने करण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले.
सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, अस्लम पटेल, शेख फरजाना, शेख शाहिन, हीना बाजी आदि उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचे रूपरेषा राहणीमानप्रमाणे वेशभूषा करून त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रसंगाचे माहिती आपल्या वक्तृत्वाद्वारे सादर केली. 
पुढे बोलतांना आबीद खान म्हणाले की, त्या काळी स्त्रीयांबद्दल जी भावना समाजामध्ये होती तीच भावना आजपण समाजामध्ये रुप बदलून वावरत आहे. स्त्रीया आज शिक्षित झाल्या, मोठमोठ्या पदावर पोहचल्या तरी त्यांना आज व्यक्ती स्वातंत्र्य असल्याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. परंतु आता समाजाने हा दृष्टीकोन बदलून स्त्रीयांना सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुमताज शेख यांनी केले तर प्रास्तविक यास्मीन शेख यांनी केले. आभार सुलताना बाजी यांनी मानले.  यावेळी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
सहयोगी : स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close