*इंदापूर* : (दि.३) - शिक्षण आणि साक्षरता क्षेत्रात महिलांच्या उन्नतीसाठी स्री शिक्षणाला पुढे नेण्याची क्रांतिकारी मशाल सावित्रीबाईंकडे होती, ती मशाल त्यांनी पेटविल्याने आजच्या पिढीतील स्रीया शिक्षित झाल्या, असे प्रतिपादन राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक जावेद शेख यांनी केले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे,मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात प्रा. शेख बोलत होते.
यावेळी प्रा. मेघा यादव यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार व तथागत गौतम बुद्ध मूर्तीस , इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणं केली.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे,मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.

