गणपती बाप्पा आनंद दे रे,
दे रे सुखशांती
तुझे किरण अन् तेज देऊनी
दे मजला शक्ती
तू सकलांचा भाग्यविधाता
दिव्य तुझी गाथा
शरण येऊनी नमनची करतो
टेकवूनी माथा
हे गणराया मनीची ईच्छा तुच तुच पुरविशी
ईच्छित मनीचे माझ्या सारे तुच सदा जाणशी
प्रसन्न मूर्ती अगाध कीर्ती पहाता विसरे भान
मनापासूनी मागणी माझी दे मज हृदयी स्थान
काय मला जे हवे मागता स्मरतच नाही काही
जगद्नियंत्या बाप्पा तुची दिसशी सर्वठायी
पुण्यरत्न डॉ चंद्रकांत शहासने,पुणे
९८८१३७३५८५

