shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर येथे बच्चूभाउ कडू यांचे उपस्थितीत दिव्यांग भवनाचा लोकार्पण सोहळा तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचा भव्य शेतकरी व कामगार मेळावा..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
सोमवार दिनांक २९ जानेवारी २०२४

श्रीरामपूर : देशभरातील शेतकरी, कष्टकऱ्यांचे कैवारी, कामगार, गोरगरीबांचे हक्कासाठी दिवसरात्र लढणारे पालनहार, अंध, अपंग, अनाथांचे ह्रदयसम्राट व रुग्णांचे झुंजारवादी व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांची बुलुंद तोफ, महाराष्ट्राचा प्रखर आवाज, राज्याच्या दिव्यांग विभागाचे प्रमुख तथा प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख आदरणीय लोकनायक  मा.ना.श्री.बच्चूभाऊ कडू यांचे प्रमुखं उपस्थिती मध्ये सोमवार दि २९/०१/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता महात्मा गांधी रोड, आझाद मैदान, श्रीरामपूर येथे भव्य शेतकरी, कामगार, पशुपालक व दूध उत्पादकाचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. 
      कार्यक्रमाची रूपरेषा नमूद करताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगीतले की, ना . बच्चुभाऊ कडू यांच्या शुभ हस्ते हस्ते व महसूलता जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम श्रीरामपूर नगर परिषदेच्या मिनी स्टेडियम जवळ महाराष्ट्रातील एकमेव अश्या दिव्यांग भवनाचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, आ. सत्यजित तांबे, आ. लहुजी कानडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ साहेब, उपविभागीय अधिकारी किरण सावंत साहेब, मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
      पुढे बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी म्हंटले आहे की, प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने या कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे यांचे सह प्रहारचे सर्व जिल्हा पदाधिकारी त्याचबरोबर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ उप प्रमुख लक्ष्मण खडके, कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे व सर्व प्रहार तालुका कार्यकारिणी, तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शहर प्रमूख व पदाधिकारी जिल्हयातील सर्व तालुका प्रमूख व कार्यकारिणी आणखी तमाम प्रहार सैनिक व शेतकरी, दुध उत्पादक आणि कामगार बंधू उपस्थित राहणार आहेत. 
      प्रसंगी दिव्यांग मंत्रालय व  श्रीरामपूर नगरपरिषद यांचे संयुक्त विद्यमाने या दिव्यांग भवन मध्ये उद्घाटन झाल्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
    या उद्घाटन सोहळ्यानंतर बच्चुभाऊ कडू आणि सर्व प्रहार सैनिक रॅलीने आझाद मैदान या ठिकाणी जाणारा असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी भव्य असा शेतकरी कामगार दुग्ध उत्पादक यांचा मेळावा होणार आहे. 
     तरी शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी, कामगार, दिव्यांग, विद्यार्थी यांनी लाखोच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आव्हान प्रहार चे जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close