एल.जी. बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल सेमी इंग्लिश ज्युनियर कॉलेज पळसदेव मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
इंदापूर:- गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल सेमी इंग्लिश ज्युनियर कॉलेज पळसदेव मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ. हनुमंत नाना बनसुडे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कवायत प्रात्यक्षिक तसेच देश प्रजासत्ताक होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले अशा थोर क्रांतीकारांविषयी मनोगत व्यक्त केली.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या वंदना बनसुडे मॅडम यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच भारताला सर्वश्रेष्ठ राज्यघटना देणारे महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेच्या मसुदा समितीतील सर्व सदस्य यांना अभिवादन केले.व संस्थेचे अध्यक्ष हनुमंत नाना बनसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रांमध्ये विद्यार्थी पण करीत आहेत.
यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, सदस्य हनुमंत आप्पा मोरे, अंकुश बनसुडे सदस्या अर्चनाताई बनसुडे,अनुराधाताई कणके विश्वस्त बाबा आप्पा बनसुडे, दिलीप भगत किरण काळे तसेच सर्व पालक ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण मदने व तेजस्विनी तनपुरे व आभारप्रदर्शन सुजाता ढवळे यांनी केले.

