shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिव्यांग व्यक्तींना संगणकीय युगात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची नितांत गरज - प्रांताधिकारी किरण सावंत पाटील


श्रीरामपूर प्रतिनिधी:
दिव्यांग व्यक्तींना संगणकीय युगात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे. मूकबधिर विद्यालयातील मुलांची शैक्षणिक व सामाजिक प्रगती क्षितिजापलीकडले विश्व निर्माण करणारे प्रकाशयात्री आहेत

           शैक्षणिक प्रगतीपुस्तका बरोबरच दिव्यांगांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी मूकबधिर विद्यालयातील सामाजिक पुनर्वसन केंद्र सातत्यपूर्ण उत्कृष्ट समाज सेवा करत आहे.याचा सर्वार्थाने प्रशासनाला अभिमान आहे. असे प्रतिपादन स्मार्ट टि.व्हि.प्रदान कार्यक्रम प्रसंगी श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले.

            मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगती करिता प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी आपली कन्या कु.गार्गी हिच्या पाचव्या वाढदिवसाचे औचित्य साधून मूकबधिर विद्यालयास डिजिटल स्मार्ट टि.व्हि.प्रदान केला.
          याप्रसंगी रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे खजिनदार विनोद पाटणी, मूकबधिर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक रामदास रासकर, दिव्यांग सामाजिक पुनर्वसन केंद्र अधिकारी संजय साळवे,सौ. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
         याप्रसंगी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत वाढदिवस साजरा केला.गायिका सौ.उज्वला मोरगे यांनी सुमधुर आवाजात गीत सादर केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक चंद्रकांत सांगळे, दिपक तरकासे, शेटकार,पोपट वांयदेशकर,मुकिंद गाडेकर, मधुकर पवार,सौ.गाढे, सौ. तुरुकमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close