अहमदनगर जिमाका वृतसेवा:
माजी सैनिक,माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी शिष्यवृती दिली जाते. शिष्यवृत्तीचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे ऑनलाईन प्रक्रियेने सादर करण्याची मर्यादा ५ जानेवारी, २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
पाल्यांनी अर्ज व संबंधित मुळ कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्याकडून पडताळून घ्यावा व या सवलतीचा अधिकाधिक पाल्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोरडे (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

