अहमदनगर जिमाका वृतसेवा:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर "संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह योजना" सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशी दोन वसतीगृह मंजूर झाले असुन निकष पुर्ण करणाऱ्या इमारत मालकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शासकीय वसतीगृहासाठी शेवगाव तालुक्याच्या ठिकाणी खाजगी इमारती भाडे तत्वावर घ्यावयाच्या आहेत. भाडे तत्वावरील घेण्यात येणारी इमारत ही शैक्षणिक संस्थाच्या मध्यवर्ती ठिकाणी असावी. इमारतीचे क्षेत्रफळ मोकळ्याजागेसह प्रती विद्यार्थी १०० चौ. फुट या प्रमाणे १०० विद्यार्थ्यांसाठी दहा हजार चौ. फुट पर्यंत इमारतीचे क्षेत्रफळ असावे. १० विद्यार्थ्यांमागे एक स्नान गृह व एक स्वच्छता गृह असावे. पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा व पथ दिवे यासह इतर सुविधा असाव्यात. इमारतीस सर्व बाजुंनी सुरक्षा भिंत असावी.
जे इमारत मालक उपरोक्त निकष पूर्ण करत असतील अशा इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाज कल्याण, अहमदनगर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सावेडी नाका, नगर- मनमाड रोड, अहमदनगर दूरध्वनी-०२४१-२३२९३७८ या कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

