shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाजाप्रती असलेली बांधिलकी वर्ल्ड पार्लमेंटला शब्दशः महान बनवते - प्रकाश कुलथे



श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील गणमान्य व्यक्तींना "  वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२३ " हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह सभामंडपात थाटामाटात संपन्न झाला.

             याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून महाराष्ट्र शासनाच्या संपादकीय मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. प्रकाशजी कुलथे हे बोलत होत. डब्ल्यूसीपीएच्या अनेक उपक्रमांचे साक्षीदार असलेले कुलथे यांनी जगाच्या दोनशेवर देशात डब्ल्यूसीपीएच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचा गौरव केला. त्याच ओघात त्यांनी समाजाप्रती असलेली डब्ल्यूसीपीएची
बांधिलकी वर्ल्ड पार्लमेंटला शब्दशः महान बनवते असे धाडसी वक्तव्य केले.
           याबरोबरच खासदार गोविंदराव लॉ (विधी) कॉलेजच्या प्राचार्या राजभोज मॅडम, नाशिक येथील  प्राचार्या सुवर्णा बोडके, ग्रेट इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड बुकचे संपादक डॉ. इंद्रजित मोरे, दै. बालेकिल्ला मालेगावचे संपादक निवृत्ती बागुल, दै. लोकनामा (नाशिक) संपादक -चंद्रशेखर शिंपी, उद्योजक मनजितसिंग बतरा, वरिष्ठ कायदेतज्ञ शहानूर सय्यद यांनीही आपले मौलिक मनोगत व्यक्त केले. 
              भारतीय समाजात व वैद्यकिय क्षेत्रात मोलाचे स्थान असलेल्या तुळशीला जलार्पण करून करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उद्योजक / व्यापारी मनजितसिंग बतरा पुरस्कृत पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे अनावरण करण्यात आले. ग्रेट इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड बुकच्या २०२३ च्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच साई विठ्ठल अनाथाश्रामातील मुलामुलींना नवीन कपडयांचे वाटप
उद्योजक / व्यापारी मनजितसिंग बतरा यांच्या सहकार्याने करण्यात आले.
               डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा व भविष्यातील नियोजनाची माहिती आपल्या प्रास्ताविकात विषद केली. खजिनदार सी.के भोसले काका यांनी अध्यक्षीय सुचना मांडली तर सहसचिव ऋषिकेश विघावे यांनी अनुमोदन दिले. सचिव बाळासाहेब कोठुळे यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर उपक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात खालील मान्यवरांना सन्मानीत  करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. तो पुढीलप्रमाणे -
मा. डॉ.विजय अशोक कोळी, कोल्हापूर, युथ आयकॉन (सामाजिक कार्य, साहित्य आणि चित्रपट), मा.डॉ.राजेंद्र तातू ननावरे, मुंबई, (सामाजिक कार्य आणि वैद्यकीय व्यवसाय. क्षयरोग आणि छातीच्या आजारांमध्ये विशेष. पदव्युत्तर शिक्षण.  इंडियन जर्नल ऑफ टीबीचे संपादक),  मा.श्री.आत्माराम रामदास शेवाळे, शेवगाव (साहित्य आणि सामाजिक कार्य), मा.श्री. प्रमोद शंकर डोंगरे, सामाजिक कार्य आणि निवृत्त नायब तहसीलदार (चोपडा, जळगाव), श्री.वसंत कारभारी अहिरे, मालेगाव, (पत्रकारिता आणि सामाजिक कार्य),  सौ.प्रमिला शंकर गावडे, राहुरी, (शिक्षण आणि सामाजिक कार्य),  मा.डॉ.छाया वेच्‍या थिंगळे,  मुक्ताईनगर, जळगाव, (शिक्षण, साहित्य आणि सामाजिक कार्य), मा.श्री.किरण शिवाजी पाटील, मालेगाव (शिक्षण, साहित्य आणि सामाजिक कार्य), मा.श्री.अनिलकुमार द्वारकादासजी पालीवाल, चोपडा (पत्रकारिता आणि सामाजिक कार्य), मा.डॉ. संदिप गुन,जलपाईगुडी, पश्चिम बंगाल, (उत्कृष्ट नेतृत्व व शिक्षण क्षेत्र),  मा.श्री.शेख हारून बाबूलाल, लासलगाव  (शैक्षणिक संस्था चालवणे, पत्रकारिता 
आणि सामाजिक कार्य), मा.श्री. चंद्रशेखर प्रल्हाद शिंपी वृत्त संपादक - दै. लोकनामा, नाशिक (पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि शिक्षण), मा. प्रिती मधुकर म्हसदे, नाशिक (शिक्षण आणि सामाजिक कार्य),  मा. श्री. निवृत्ती बागुल,
संपादक -दै. बालेकिल्ला मालेगाव, (पत्रकारीता व सामाजिक कार्य ), मा.श्री.राकेश शिवप्रसाद शर्मा (समाजकार्य). तसेच कार्यक्रमाचे आपल्या रसाळवाणीने सुत्रसंचलन करून बाळासाहेब कोठुळे यांनी आगळी वेगळी रंगत आणली. जेष्ठ कवी भास्कर दादा लगड व मुकुंद तांबे यांनी आपल्या प्रसिध्द काव्यरचना सादर करून वातावरणात रंग भरले.
             पुरस्कार्थींच्या वतीने डॉ. राजेंद्र ननवरे, श्री. किरण पाटील, प्रमोद डोंगरे, अनिल कुमार पालिवाल, सौ.प्रमिला गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. डब्ल्यूसीपीए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, सचिव बाळासाहेब कोठुळे, सहसचिव ऋषिकेश विघावे, खजिनदार सी.के भोसले, को- ऑर्डिनेटर प्राचार्या सुवर्णा बोडके, लिगल एडवायजर शहानूर सय्यद यांच्या परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी झाला.
close