पुणे प्रतिनिधी:
सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभहस्ते व समाजसेवक कैलास पवार यांच्या मुख्य संकल्पनेतून लोक सहभागातून जन सर्वांगीण विकास घेऊन असंख्य सेवाभावी लोकांना संघटित करीत २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी स्थापित झालेले भूमी फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून ग्रामीण भागातील विविध स्वरूपाचे लोकाभिमुख व जनकल्याणकारी इत्यादी स्वरूपाचे उपक्रम राबवून महाराष्ट्र राज्यभर उत्कृष्ट कार्य करीत आहे.
१४ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.पराग काळकर साहेब यांच्या शुभहस्ते तसेच भारतीय हवाई दलाचे एअरमार्शल प्रदीप बापट, रांका ज्वेलर्स उद्योग समूहाचे संस्थापक फत्तेचंदजी रांका, सिल्वर ग्रुप चे डायरेक्टर संतोष बारणे, नवचैतन्य हास्य योग परिवाराचे विठ्ठल काटे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यशोगाथा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे संपन्न झाला असून भूमी फाऊंडेशन या राज्यव्यापी सामाजिक संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषक कन्या,एकल महिला निराधार कन्या इत्यादी करता या नवीन वर्षात संगोपनासाठी उचललेल नवीन पाऊल हे अत्यंत गौरवस्पद आहे. या उपक्रमाला सर्वांचा हातभार मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश सातव पाटील हे आपल्या निवासस्थानी बोलत होते.तसेच कैलास पवार यांची राष्ट्रीय मानव अधिकार व सामाजिक न्याय आयोग दिल्ली च्या महाराष्ट्र सेक्रेटरी सोशल सेल पदी निवड झाल्याबाबत सन्मान करीत पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.यावेळी मनसे वडगाव शेरी मतदार संघाचे उपाध्यक्ष प्रकाश भाऊ जमदाडे,मनसे संघटक नितीन सांगळे,बी.जे.एस. विद्यालयाचे सोमनाथ पाबळे, सेवानिवृत्त सैनिक दादासाहेब जाधव आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार लक्ष्मण भिसे - इंदापूर - पुणे)
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

