*श्री. नारायणदास रामदास शाळा ही गोरगरिबांची हक्काची शाळा - राजवर्धन पाटील*
इंदापूर :- इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील श्री.नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना निरा भिमा व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाजप युवा मोर्चा कोअर कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील म्हणाले की विद्यार्थ्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाकरिता सर्व सुविधा देणारी तालुक्यातील श्री. नारायणदास इंग्लिश मीडियम स्कूल ही एकमेव प्रशाला आहे.
राजवर्धन पाटील म्हणाले की,' या प्रशालेचे कौतुक करतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे सुंदर सांस्कृतिक उपक्रम घेतला. ही प्रशाला सुरुवातीला एका छोट्या खोलीमध्ये सुरू झाली आज तिचे मोठे स्वरूप झाले असून सर्वसामान्य व्यक्तीच्या शैक्षणिक विकासाकरता ही प्रशाला कार्यरत आहे. ही आपली संस्था असून या संस्थेच्या विकासाकरिता , विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आपण प्रयत्नशील राहावे.'
संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी म्हणाले की,' इंग्रजी माध्यमाला असलेले महत्त्व लक्षात घेऊन सर्वसामान्य व्यक्तीला सामोरे ठेवून कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी ही इंग्रजी माध्यमाची प्रशाला सुरू सुरू केली. या प्रशालाने मोठी शैक्षणिक प्रगती साधली आहे.
यावेळी संस्थेचे संचालक गणपत भोंग, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादा पिसे, भाजप व्यापारी आघाडीचे सागर गानबोटे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पांढरे, महादेव पांढरे, रणजीत श्रीराम ,मुख्याध्यापक संजय सोरटे, मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यावेळी उपस्थित होत्या.
श्री. नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका फौजिया शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशालेने सर्वोत्तम गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केला असून निकालाची मोठी परंपरा या प्रशालेस आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका रोहिणी नलवडे , यास्मिन मुलाणी, वर्षाराणी गाडे यांनी केले.
आभार भाग्यश्री सुर्वे यांनी मानले. श्री.ना.रा.हायस्कुल तसेच ज्यु.कॅालेजचे प्रा.भाऊ झगडे आणि इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

