shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.*

*भिमाई आश्रमशाळेत ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.*
*इंदापूर* : ( दि.२६) - येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
यावेळी जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुध्दांच्या मूर्तीस व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ध्वजारोहण भारतीय सैन्य दलातील निवृत्त हवालदार मधुकर लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला मखरे (काकी),सचिव ॲड. समीर मखरे , संचालक राहुल सवणे,मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे व सर्व शिक्षक,प्राध्यापक,अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.
close