shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रणसिंग महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रणसिंग महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
फोटो ओळ - कळंब ता. इंदापूर येथे ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित मान्यवर.......
इंदापूर:- इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर महाविद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव  विरसिंह  रणसिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन समारोह संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे विश्वस्त  शंकरराव  रणसिंग,प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग आणि क्रीडा विभाग संचालक डॉ .सुहास भैरट उपस्थित होते. इतिहास विभागातील प्रा. डॉ.दादाराव मनेरे यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले. याप्रसंगी महाविद्यालयात युवा सप्ताह स्पर्धेक  विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरसिंह  रणसिंग यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील देशातील होणाऱ्या घडामोडींचा आढावा घेतला.देशातील ग्लोबिंग वॉर्मिंग, लोकसंख्या वाढ तसेच रोजगाराच्या संधी याबाबतीत निर्माण होणारी दरी याविषयी मार्गदर्शन केले.सध्याचा कालखंड हा सोशल मीडियाने ग्रासलेला आहे. त्यामुळे कौशल्य विकसित प्रोग्रॅम तरुण पिढीने हाती घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विद्या गुळीग व आभार प्रा. राजलक्ष्मी रणसिंग यांनी व्यक्त केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


close