शिर्डी प्रतिनिधी:- शिर्डी राष्ट्रीय पशुपालक परिषदेचे नुकतेच भव्य अधिवेशन विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले यावेळी भारतीय जनता पार्टी महामंत्री व संभाजीनगर म्हाडाचे अध्यक्ष राज्यमंत्री संजय केणेकर महाराष्ट्र गोसेवा महामंडळाचे अध्यक्ष व राज्यमंत्री शेखर मुंदडा राहुल केंद्रे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे आदी विविध मान्यवरांच्या उपस्थित पार पडले भटकंती करत देशी गाय बकरी उट पालन करणाऱ्या लोकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले असून भटकंती करणारे जे लोक आहेत त्याना समाजाच्या प्रवाहात आणून शिक्षण आरोग्य व निवास व्यवस्था व जीवनमान उंचावण्यासाठी हे सरकार वचनबद्ध असल्याचे शेखर मुंदडा यांनी सांगितले.
शेखर मुंदडा म्हणाले की ७०वर्षात कोणत्याही सरकारने गोपालकासाठी काम केले नाही त्याच्या अडचणी समजून घेतल्या नाही मात्र भाजप सरकारने पशुपालन करत असलेल्या व जगलाचा राजा असलेल्या बांधवाच्या ज्या काही अडचणी असतील त्या केद्र व राज्य सरकार सोडविण्यासाठी वचन बध्द असल्याचे सागितले.
यावेळी दत्ता खेमनर ,नानासाहेब शिंदे ,ॲड दीपक पाटील प्रदेश उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी नानासाहेब काटकर संपत जाधव दीपक धुमसे सचिन तांबे विनोद संकलेच्या अनेक मान्यवर उपस्थित होते.

