shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या "विशेष श्रमसंस्कार शिबिरा" अंतर्गत आयोजित "मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप"

खेड-
"गाडकवाडी ता.खेड येथे श्रीमती सी.के गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या "विशेष श्रमसंस्कार शिबिरा" अंतर्गत आयोजित "मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप" शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद!-१३० पेक्षा अधिक लोकांचा सहभाग!


      खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गायकवाडी या ठिकाणी दापोडी पुणे, येथील जनता शिक्षण संस्थेचे श्रीमती. सी.के गोयल कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे "विशेष श्रम संस्कार शिबिर" दिनांक १४ जानेवारी ते 20 जानेवारी २०२४ या कालावधीत संपन्न होत आहे.

      शिबिरामध्ये सामाजिक जाणिवेच्या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून त्यामध्ये "महिला उद्योजकता विकास शिबिर", "मोफत पशु चिकित्सा शिबिर", " मोफत डोळे तपासणी व चष्मेवाटप शिबिर", सकाळी श्रमदान, दुपारी व्याख्यान मला, संध्याकाळचे "सांस्कृतिक कार्यक्रम" यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात होत आहे. व या कार्यक्रमांना गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

     गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी श्री.मयूर दौंडकर" युवा फाउंडेशन राजगुरुनगर" यांच्या सौजन्याने गावातील लोकांसाठी "मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर" आयोजित करण्यात आले होते.
      "मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे" उद्घाटन: सकाळी ठीक ९:३० वाजता ग्रामपंचायतच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी श्री.विजय बडे (अध्यक्ष,मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठान ) श्री. आकाश दौंडकर, श्री .स्वप्निल दौंडकर, श्री.अक्षय विधाते, हे मान्यवर "मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानच्या" वतीने उपस्थित होते.
     तर ग्रामस्थांमधून आनंदराव  गाडगे, काळूराम राक्षे, संभाजी गावडे, विठ्ठल  गावडे, फुलचंद सरडे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
       शिवराच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री .विजय बडे म्हणाले" मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून गाडकवाडी ता. खेड सारख्या दुर्गम भागात वयोवृद्ध माणसांचे प्रमाण जास्त असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर गरजेचे होते. त्या दृष्टीने सदर शिबिर राबविण्यात आले आहे.
     गाडकवाडी सारख्या गावामध्ये २१व्या शतकात असताना सुद्धा मोबाईल अभावी संपर्कासाठी लोकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत व संबंधित विभागाशी पाठपुरावा करून  ग्रामस्थांसाठी मोबाईल टॉवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊन प्रदीर्घ प्रलंबित समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन या प्रसंगी देण्यात आले.
      "मोफत नेत्रपासणी व चष्मे वाटप शिबिरासाठी " ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. गावामध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या मोठी असून त्यांना या शिबिराचा मोठा फायदा झाला. या शिबिरामध्ये १३० पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला व शिबिराचा लाभ घेतला.
     शिबिराचे संयोजन: राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सिद्धार्थ कांबळे, प्रा.उत्तम गोरड, प्रा.अक्षदा पानसरे, श्री. लक्ष्मण कोहीणकर यांनी केले.
         तर संयोजनासाठी रत्नप्रभा मोरे, काजल काटे,, कपिल कांबळे, धीरज ससाणे व इतर विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
     "मयूर दौंडकर युवा प्रतिष्ठान" राजगुरुनगर यांच्या सौजन्याने सदर शिबिर संपन्न झाले.
 शिबिराचे सूत्रसंचालन: प्रा.डॉ. बाळासाहेब यांनी केले.
प्रास्ताविक: विजय बडे यांनी केले. आभार स्वप्निल दौंडकरर यांनी मानले.
close