shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कदम विद्यालयात माता पालक संघाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.

*कदम विद्यालयात माता पालक संघाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.
इंदापूर:- रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूर मध्ये विद्यालयातील माता-पालक संघाच्या वतीने सर्व माता पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.प्राची देवकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. महिलांनी आरोग्य विषयक स्वतःची व आपल्या पाल्याची कशाप्रकारे काळजी घ्यावी, आहार कोणता असावा, त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यावी तसेच मासिक पाळी मध्ये कोणती काळजी घ्यावी याविषयी सर्व माता पालकांना मार्गदर्शन केले.  मुलगा -मुलगी भेदभाव न करता दोघांकडे सारखेच लक्ष देऊन त्यांना योग्य संधी उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन केले. पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी आई म्हणून आपली भूमिका कशाप्रकारे निभवावी याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी छाया पडसळकर,  रेश्मा शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, पर्यवेक्षिका पुष्पा काळे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा रेश्मा शेख, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सपना वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस  तालुका अध्यक्षा छाया पडसळकर व अनेक महिला पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन प्रिया भोंग यांनी केले तर आभार वर्षा नागणे यांनी मानले.
close