श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोकनगर महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सुनीताताई मिलिंद गायकवाड यांचा नव्या वर्षाप्रारंभी पीएच. डी. प्राप्तीबद्दल वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला.
प्राचार्य डॉ.सुनीताताई गायकवाड यांनी 'भारतीय संस्कृती आणि जपानी संस्कृती यांचा तुलनात्मक अभ्यास 'या विषयावर प्रबंध लिहिला होता.या विषयास विद्यावाचस्पती अर्थात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.अतिशय प्रतिकूल अवस्थेत जीवनसंघर्ष करीत त्यांनी ही पदवी प्राप्त केली, त्याबद्दल माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एकनाथ औटी आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कौतुक करीत प्राचार्य डॉ. गायकवाड यांचा शाल, श्रीफळ, बुके, पुस्तके देऊन सत्कार केला.
याबद्दल प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी राजस्थान विद्यापीठ आणि शिस्तबद्व संशोधनाचे अनुभव सांगितले.जीवनात संयम आणि आदर्श जपणे यातूनच आपणास यश मिळाले असे उदगार काढून आभार मानले.
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

