shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडी शाळेत रंगला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा.*


*बांडेवाडी शाळेत रंगला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा.*

*मकर संक्रांती निमित्त आयोजीत हळदी कुंकू व  वान वाटप समारंभात महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजन.*
इंदापूर:दि. 29 जिल्हा परिषद् प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांचे संयुक्तपणे मकर संक्रांतीचे औचित्य साधुन हळदी कुंकु , वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जेष्ठ महिलांचे सस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पुजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
         महिलांनी उत्कृष्ट उखाणे घेत हळदी कुंकु व वाण वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांना संगीत खुर्ची , तळ्यात मळ्यात , बकेट बाँल मनोरे रचणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये अनुक्रमे अर्चना डोंगरे , पवित्रा जैन , रेणुका डोंगरे , जयश्री बांडे , सोनल माने , सारिका बांडे , पुष्पा बांडे , अंजली बांडे , रूपाली बांडे , सायली हेगडे , स्वाती बांडे , मीना कोकाटे यांना प्रथम क्रमांक प्रेशर कुकर , द्वितीय क्रमांक ईडली कुकर , तृतीय क्रमांक हाँटपाँट बक्षिसे देण्यात आली. लकी ड्रॉ कुपन काढण्यात आले. त्यामध्ये रेणुका डोंगरे पैठणी साडी , सोन्याची नथ अनिता बांडे , घड्याळ निर्मला गावडे व रंजना शिंदे यांना मिळाले. विजेत्यांना सोनाली कुचेकर , बापुसो राहिगुडे , रामदास बांडे , सुहास बांडे , शांभवी टेक्सटाईल , दिपक बांडे , कविता शिंदे ,दिपक गाडेकर यांनी बक्षिसाच्या वस्तू दिल्या.अनिल नगरे यांनी सर्व महिला व मुलांना नाश्ता सोय केली. 
     यावेळी बापू आदलिंग , किरण यादव , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , उर्मिला बांडे यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

close