shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरात सायबर क्राईम आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार - डॉ. सुजय देशपांडे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती.

इंदापुरात सायबर क्राईम आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार - डॉ. सुजय देशपांडे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती. 

इंदापुरात होणार सेंटर ऑफ एक्सलेंस आणि सायबर सिक्युरिटी व सायबर क्राईम याविषयी जनजागृती.
 
 इंदापूर:- सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हे प्रमाण वाढले असून त्यापैकी दोन ते तीन टक्के गुन्हे दाखल होतात परंतु सायबर गुन्हा संदर्भात असणाऱ्या अज्ञानामुळे व भीतीमुळे बरेच नागरिक गुन्हे दाखल करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सायबर सिक्युरिटी मध्ये काम करणाऱ्या टेक्निकल व्यक्तींना हे काम करण्यासाठी योग्य तेवढी माहिती उपलब्ध होत नाही. याबाबत सायबर सिक्युरिटी मध्ये इंजिनीयरच्या या अडीअडचणीचा विचार करून विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर, इंदापूर पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानगरी इंदापूर येथे सायबर सिक्युरिटी व सायबर क्राईम अवेअरनेस प्रोग्रॅम येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉक्टर सुजय देशपांडे यांनी दिली.
तसेच ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमांतर्गत सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करण्यात येईल .सामान्यतः लोकांना फक्त आर्थिक फसवणूक हाच सायबर क्राईम माहिती असतो. परंतु वेगवेगळ्या समाज माध्यमातून अफवा पसरवणे किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमातील उपलब्ध छायाचित्रांचा किंवा व्यक्तिगत माहितीचा दुरुपयोग करून एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करणे किंवा इतर कोणतीतरी वाईट माहिती पसरवणे असे प्रकार यामध्ये होत असतात. परंतु सायबर सिक्युरिटी मधील माहिती नसल्यामुळे याविषयी गुन्हे दाखल करण्यास सामान्य व्यक्ती धजावत नाही. जनसामान्यांमध्ये सायबर सिक्युरिटी ही गोष्ट दुर्लक्षितच राहिलेली आहे. या गोष्टीचा विचार करता विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर, इंदापूर पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधीच्या मार्फत याविषयी जनजागृती करून ही माहिती विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. येणाऱ्या काळात विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमधून सायबर क्राईम व सिक्युरिटी विषय समुपदेशन व मार्गदर्शन होईल. तसेच विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथे सेंटर ऑफ एक्सलेंस च्या माध्यमातून टेक्निकल सपोर्ट घेऊन सायबर क्राईम आटोक्यात आणण्यासाठी चे प्रयत्न केले जाणार आहेत तसेच हा सर्व माहितीचा खजिना या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध करून देऊन त्या माध्यमातून हे गुन्हे उकलण्यात व आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकचा स्टाफ व विद्यार्थी हे सहभागी होऊन काम करणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक संतोष देवकाते व प्राध्यापक संज्योत पाटील आणि संकल्पना प्राचार्य डॉक्टर सुजय देशपांडे यांची असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
close