शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४
आप्पासाहेब ढूस ॲट्रॉसिटी प्रकरण, चौकशी करून अहवाल सादर करा- राहुरी पोलीसांना न्यायालयाचे आदेश..!!
अहमदनगर : देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे विरोधात दाखल केलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणातील तक्रारदार दत्ता सोपान पटेकर याने ढूस यांना अडकविण्यासाठी पोलिसात खोटी तक्रार दिली म्हणून ढूस यांनी दाखल केलेल्या याचिकेवर राहुरी येथील मे. न्यायालयाने राहुरीच्या पोलीसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
या घटनेची पार्श्वभूमी असी की, देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढूस यांचेकडे राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील दत्ता सोपान पटेकर याने दीड लाख रुपयांची खंडणी स्वरूपात मागणी केली होती. अशी अनधिकृत रक्कम देण्यास ढूस यांनी नकार दिल्याने पटेकर याने ढूस यांचे विरोधात ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्या विरोधात ढूस यांनी अहमदनगर येथील मे शेषन कोर्टात धाव घेतली असता ढूस यांना मे कोर्टाने जामिन मंजूर केला. सदरचा जामीन रद्द करण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांनी मला राहुरीच्या सूतगिरणी जवळ रस्त्यात अडवून ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली असा दत्ता सोपान पटेकर याने राहुरी पोलीस ठाणे येथे खोटा गुन्हा दाखल केला. आणि सदर गुन्हा नोंद झाल्याचे कागदपत्र अहमदनगर येथील मे. न्यायालयासमोर सादर करून ढूस यांचा जामीन रद्द करण्यासाठी मे. कोर्टाला विनंति केली. तथापि हा गुन्हा खोटा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस खात्याने त्यांचा अहवाल मे न्यायालयामध्ये सादर केला. त्यानुसार अहमदनगर येथील मे न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन व त्यामधील पुरावे तपासून तक्रारदार पटेकर यांनी ढूस यांचा जामीन रद्द करणे कामीचा अर्ज फेटाळला व पटेकर यांनी असे खोटे गुन्हे दाखल करू नये म्हणून फटकारले.
तथापि पटेकर याने खोटी तक्रार दाखल करून पोलीस यंत्रणा आणि मे न्यायालयाचा वेळ घेतला तसेच मे. न्यायालयासमोर खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करुन मे. न्यायालयाची दिशाभूल केली व आप्पासाहेब ढूस यांना खोट्या केस मध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला म्हणुन तसेच यापुढे असे खोटे गुन्हे दाखल करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक थांबवावी म्हणून आप्पासाहेब ढूस यांनी खोटी तक्रार दाखल केली म्हणून पटेकर विरूद्ध कारवाई करणेची पोलीसांना विनंती केली. तथापि पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून ढूस यांनी ॲड. वर्षा गागरे यांचे मदतीने राहुरी येथील मे न्यायालयात दावा दाखल केला.
आप्पासाहेब ढूस यांचा जबाब, तसेच ॲड. गागरे यांनी युक्तिवाद करुन मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, सदरचा ३३९/२३ चा खोट्या कथनाचा गुन्हा असून ढूस यांच्यावर केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत त्यामुळे फिर्यादी ढूस यांचे आर्थिक सामाजिक व कौटुंबिक जीवनात मोठ्या प्रमाणात हानी पोचली आहे. आशा बेकायदेशीर कृत्यांना आळा बसणे गरजेचे आहे. याप्रमाणे युक्तिवाद केला आहे. सदरचा युक्तीवाद आणि सर्व कागपत्रांची तपासणी केल्यानंतर राहुरीच्या मे न्यायालयाने कलम २०२ (१) प्रमाणे घटनेचा सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे राहुरीच्या पोलीसांना आदेश दिले आहेत.
सदर केस मध्ये ॲड. वर्षा गागरे यांनी ढूस यांची मे. न्यायालयासमोर सक्षमपणे बाजू मांडली.
या विषयावर आमचे प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, सत्य परेशान हो सकता है, परास्त नही. खोटी केस करण्याची भिती दाखवुन ब्लॅकमेल करण्याची प्रवृत्ती समाजामध्ये सध्या फोफावत चालली आहे. अश्या प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी आम्हीं या खोट्या तक्रारीचा पाठपुरावा केला आहे. जर माझेसारख्या सुशिक्षित व्यक्तीला अश्या पद्धतीने खोट्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न होत असेल तर सर्वसामान्य अडाणी जनतेला किती त्रास सहन करावा लागत असेल. म्हणून यापुढे खोटी केस करताना तक्रारदारांनी शंभर वेळेस विचार केला पाहिजे यासाठी आम्हीं या केस मध्ये मुळा पर्यंत जावून सत्य बाहेर काढणार आहोत. व अश्या खोट्या तक्रारींना प्रतिबंध करण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आम्हाला राहुरी कोर्टात नक्की न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

