राहाता प्रतिनिधी:
राहाता - शहरात शुक्रवार दि २६ जानेवारी २०२४ रोजी गणतंत्र दिवसाच्या शुभ मुहूर्तावर व संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीची सांगता झाले नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध समाजाचे धर्मगुरू व नागरिकांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात येणार आहे. या संविधान पूजन सोहळा कार्यक्रम व रॅली मध्ये मोठ्या संख्येने सर्व लहान, थोर नागरिक आणि युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रदीप बनसोडे व धनंजय निकाळे यांनी केले आहे.
संविधान पूजन सोहळा व रॅली संदर्भात माहिती देतांना युवा नेते प्रदीप (पप्पूभाऊ) बनसोडे म्हणाले की, संविधान म्हणजे लोकशाहीचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. या संविधानाने गोरगरीब कष्टकरी वंचित सर्वसामान्य त्याचबरोबर सर्व धर्मीय बांधवांना अर्थात देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचे अधिकार देतांनाच समता स्वातंत्र्य बंधुत्व प्राप्त करून दिले आहेत. त्याचबरोबर स्त्री पुरुषांना व निसर्गातील साधन संपत्तीला सुद्धा एक संरक्षणाचे विशेष कवच बहाल केले आहे. २६ जानेवारी रोजी आपल्याला संविधानाने अधिकार प्राप्त करून दिले आहेत. जगात भारताच्या संविधानाला फार मोठा नावलौकिक आहे. म्हणून संविधानाचे महत्त्व प्रत्येकाला अधिक व्याप्तीने अधोरेखित व्हावे याकरिता, राहाता शहरात आम्ही सर्व धर्मीय समाज बांधवांना सोबत घेऊन संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान पूजन सोहळा व संविधान रॅलीचे आयोजन केले आहे. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तसेच संविधानाचे प्रतिमेची फुलांनी सजवलेल्या शोभारथाद्वारे मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध उपनगरात रथात ठेवलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे मोठ्या मनोभावे पूजन करण्यात येणार आहे. संविधानाच्या प्रतिमेवर पुष्प अर्पण करून जागोजागी संविधान प्रतिमेस नमन केले जाणार आहे.
ही संविधान रॅली एक वैशिष्ट्यपूर्ण राहणार असून समाजातील प्रत्येक नागरिकाला नवा संदेश देणारी ठरणार आहे. या संविधान रॅली व संविधान पूजन सोहळा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रदीप बनसोडे यांनी केले आहे.
या संविधान रॅली व पूजन कार्यक्रम सोहळ्याकरिता प्रदीप (पप्पू भाऊ) बनसोडे, धनंजय निकाळे, किशोर दंडवते, राजेंद्र पाळंदे, गणेश निकाळे, अमोल भोसले, जितु दिवे, दिलीप निकाळे, दिपक शिंदे, साई पाळंदे, सुभाष कापसे, नाना त्रिभुवन, जाॅन त्रिभुवन, रावा निकाळे, करण कोळगे, बाळासाहेब खाडे, नितीन वाघमारे, निरंजन टिळेकर, मनोज बनसोडे, अश्पाक शैख, गणेश बनसोडे, दत्तु गोडगे आदी परिश्रम घेत आहे.
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

