shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छावा मराठा संघटनेचे प्रवीण कोल्हे यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांचे विरोधात आमरण उपोषण...!


अहमदनगर :- नगर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग अहमदनगर यांचे उपअभियंता लोकसेवक डोंगरे आणि त्यांचे कनिष्ठ अभियंता लोकसेवक चव्हाण तालुक्यातील सर्व कामामध्ये भ्रष्टाचार करून आरटीआय.कार्यकर्ते,पत्रकार,पक्षाचे आणि संघटनचे पदाधिकारी यांना कॉम्प्युटर यादी करून सरसगट पैसे वाटून भ्रष्टाचार लपवण्याचे काम करून जंगम मालमत्ता जमवली असल्याची तक्रार छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कोल्हे यांनी १५/१२/२०२३ रोजी कार्यकारी अभियंता सा.बा.दक्षिण विभाग अहमदनगर यांच्याकडे केली होती पण त्या तक्रारीला महिना झाल्यानंतर ही टाळाटाळ व दिशाभूल करत कोणतीच कारवाई केली नाही.


 त्यामुळे आज दि.२४/०१/२०२४ पासून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला छावा मराठा संघटनेच्या वतीने सुरुवात केली आहे तसेच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कोल्हे यांनी असे सांगितले की, पैसे वाटतानाचे व्हिडिओ पुरावे असतानाही उपअभियंता लोकसेवक डोंगरे आणि त्यांचे कनिष्ठ अभियंता लोकसेवक चव्हाण यांच्यावर आज पर्यंत कार्यकारी अभियंता यांनी कारवाई का केली नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आणि या भ्रष्टाचाराला ते पाठीशी का घालत आहे? आणि आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ त्यांनी का येऊन दिली?म्हणजे याचा एकच अर्थ होतो की या भ्रष्टाचारा मध्ये कार्यकारी अभियंता ही सामील आहे असे वाटते असे त्यांनी सांगितले तसेच जो पर्यंत लोकसेवक डोंगरे आणि त्यांचे कनिष्ठ अभियंता लोकसेवक चव्हाण यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवू असे त्यांनी आम्हाला सांगितले..
close