shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकशाही सक्षम होण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक- प्रांतधिकारी किरण सावंत - पाटील


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदार नोंदणी होणे गरजेचे आहे,कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये यांकरिता अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांनी दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी मोलाचे योगदान दिले, दिव्यांग व्यक्ती करिता त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.


मतदार नोंदणी केल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार आपण वापरला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील यांनी केले. 
मतदार नोंदणी अधिकारी  २२० श्रीरामपूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ संघ श्रीरामपूर,प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना आणि सी.डी.जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा येथील सी.डी.जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.
दिव्यांग मतदार जनजागृती अभियान राबवून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्रीरामपूरच्या आसान दिव्यांग संघटनेला निवडणूक मित्र पुरस्कार संघटनेचे संस्थापक संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड यांना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,सी डी जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर,ॲड.प्रसन्ना बिंगी यांच्या शुभहस्ते देऊन  गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. डी. जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पिंगळे  यांनी केले तर आभार सौ. पाटील यांनी मानले.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close