*महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार - गणेश लोंढे पुणे जिल्हा प्रभारी रासप.
इंदापूर : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असे
दि. ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व महासचिव माऊली सलगर यांच्या सूचनेनुसार बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये इंदापूर तालुक्यात घोंगडी बैठका गाव भेट दौरा सुरू करण्यात आली असून यावेळी रासपाचे जिल्हा प्रभारी गणेश लोंढे यांनी माहिती देताना म्हटले आहे.
यावेळी उपस्थित पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे ,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, तालुका कार्याध्यक्ष नवनाथ कोळेकर, श्रीनिवास सातपुते प्रवक्ते शहराध्यक्ष ,लक्ष्मण तरंगे तालुका उपाध्यक्ष, शाखाध्यक्ष तुकाराम करे, गणेश हेगडकर, तात्याराम मारकड इत्यादी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच गाव भेट दौऱ्यामध्ये स्थानिक मतदार बंधू भगिनींच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सर्वसामान्य शेतकरी उपेक्षित शोषित पीडित समाज बांधवांमध्ये राजकीय चर्चेमधून फक्त जानकर साहेबच आम्हाला खासदार म्हणून पाहिजेत अशी भावना माणसातून प्रती क्रिया समाजातून आली अशी माहिती पुणे जिल्हा प्रभारी गणेश लोंढे यांनी दिली.

