देहरे येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केलेल्या आरोपींना अटक करा....अन्यथा भिगवण बंद करून जेलभरो आंदोलन व रास्तारोको करण्याचा इशारा.
वडार महाराष्ट्र संघटना पुणे व भिगवन येथील समाज बांधवांच्या वतीने भिगवन पोलीस स्टेशन मध्ये दिले निवेदन.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील मी वडार महाराष्ट्र संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ व सोमनाथ धोत्रे, शाम जाधव ,गणेश गोविंद कुसाळकर , काळु कुसाळकर, अनिल कुसाळकर, सुनिल लष्करे , महेश गुंजाळ , ऋषी गुंजाळ , जालिंदर जाधव , गणेश गोरख कुसाळकर इत्यादींच्या वतीने देहरे येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केलेल्या आरोपींना अटक व फाशीची शिक्षा करण्याबाबतचे निवेदन पत्र पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भिगवण यांना
देण्यात आले असून यामध्ये नमूद केले आहे की,कु. साक्षी तुकाराम पिटेकर वय १३ वर्षे हिस दि. १३/०१/२०२४ रोजी दुपारी ०३:०० वा. तिचे राहते घरामधुन गोटया उर्फ ऋत्वीक संजय जाधव, रा. जाधव वस्ती, देहरे, ता. जि. अहमदनगर व कु. प्रिती बाबा जाधव, रा. जाधव वस्ती, देहरे, ता. जि. अहमदनगर आरोपीने अज्ञात कारण करीता पळुन नेले म्हणुन साक्षीची आई सुवर्णा हिने दिलेले फिर्यादी वरुन एम.आय.डी.सी पो.स्टे. ला गु.र.नं २५/२०२३ भादंविक ३६३ प्रमाणे गुन्हा दि. १४/०१/२०२४ रोजी दाखल करण्यात आले होते.
पोलिसांच्या तपासात हि सर्व बाब उघडकीस आली आहे परंतु त्या आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेले नाही. सदर आरोपी बिन्दास्त पणे वावरत आहेत व मुलीच्या घरच्याना केस माघे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत आहेत.तरी आपणास विंनती कि त्या आरोपीना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा आम्ही भिगवण बंद करून जेलभरो आंदोलन व रास्तारोको करू अशा आशयाचे पत्र देण्यात आले आहे.
यावेळी सोमनाथ धोत्रे,
सुनिल लष्करे,अनिल कुसाळकर,काळू कुसाळकर
बाबासाहेब गुंजाळ,गणेश कुसाळाकर,महेश गुंजाळ,
गणेश कुसाळकर,संदिप गुंडाळे, जालिंदर जाधव,राहुल कदम,सागर धोत्रे, सोहम धोत्रे इत्यादी उपस्थित होते.

