shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाहन चालविताना आपल्यासह इतरांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी - महेश देवकाते


*रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक नियम जन जागृतीकरीता पेण शहरात मोटार सायकल रॅली*

पेण प्रतिनिधी:
केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला पेण येथील बायपास रोड येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.


ही मोटरसायकल रॅली पेणमधून काढण्यात आली होती. यामध्ये विविध खासगी, शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारीवर्ग तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून सहभाग घेतला होता. या वेळी पेण आरटीओ कार्यालयाच्या वतीने मोटरसायकल तसेच वाहन चालकांना वाहतुकीचे सर्व नियम पाळावे, असे सांगण्यात आले. तसेच या वेळी हेल्मेटचा वापर करणे, सिट बेल्ट लावणे, उजवी- डावी बाजू पाहणे, वेगावर नियंत्रण ठेवणे या सर्व गोष्टींचे पालन करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. यावेळी बोलताना आरटीओ अधिकारी महेश देवकाते म्‍हणाले की, वाहनधारकांनी वाहन चालविताना आपल्यासह इतरांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी. यामुळेच अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होतील. तसेच या अभियानाद्वारे विविध ठिकाणी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळूनच वाहने चालवावीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, सहाय्यक अधिकारी माधव सूर्यवंशी, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरमे, अधिकारी अनिल बागवान, सुरेश तुरकणे, प्रशांत बच्छाव, सहायक वाहन निरीक्षक नंदन राऊत, दत्तात्रेय जगताप, अभिजित तेरी, जगनाडे, दिनेश शर्मा, समीर चव्हाण आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close