shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भूमी फाउंडेशनच्या वतीने सिको टूल्स आणि डेल्फिनगन कंपनी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित...!


श्रीरामपूर प्रतिनिधी:
सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभहस्ते व संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या मुख्य संकल्पनेतून लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास हे ब्रीद वाक्य घेत २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन स्थापित भूमी फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात,ग्रामीण भाग विकास ,विधवा निराधार महिला, अनाथ निराधार मुली , शेतकऱ्यांच्या गरजू मुलींकरिता उत्कृष्ट कार्य करीत आहे.तसेच भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था राज्यभरातून दोन कंपन्यांची निवड करीत असते. 


यावर्षी भूमी फाऊंडेशन च्या चौथ्या वर्धापनदिनी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात सेको टूल्स इंडिया कंपनी आणि डेल्फिनगन कंपनी या दोन पुण्यातील कंपन्यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने देखील  या दोन्ही कंपन्यांच्या सर्व व्यवस्थापकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच याप्रसंगी व्यवस्थापकांनी देखील भूमी फाउंडेशनचे सामाजिक कार्य पुढे घेऊन जाण्याचे साठी सदैव आमचा सहभाग आम्ही देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close