shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये खेळाच्या स्पर्धा संपन्न

पुणे,वाघोली प्रतिनिधी:
 स्वलक्ष एज्युकेशन सोसायटीचे अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूल लोणीकंद पुणे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढगे तसेच सचिव स्वप्निल ढगे, हर्षल ढगे आणि प्राचार्य पूजा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचा शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक सर्वांगीण दृष्ट्या विकास व्हावा या मुख्य उद्देशाने शाळा अंतर्गत भव्य खेळाची स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी गटा प्रमाणे घेण्यात आली.सदर स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या गटाला मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस देण्यात आले.


या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून स्वप्निल ढमढेरे तसेच भूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कैलास पवार, संस्था सचिव हर्षल ढगे, पत्रकार गव्हाणे ,प्राचार्य पूजा मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकांची देखील मोठी उपस्थिती लाभली.या उपक्रमाला क्रीडा शिक्षक तसेच बडे सर,आनंद कवठे आणि सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close