shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गॅस एजन्सीच्या कारभारावर नाराजगी एजन्सींकडून होत असलेली लुट थांबवा

श्रीरामपूरचा ग्राहक दिन चांगलाच गाजला; गॅस  एजन्सीला पॉझ मशीन द्या, ग्राहकांची मागणी

श्रीरामपूर प्रतिनिधी:
गॅस एजन्सीकडून होत असलेली ग्राहकांची लुट थांबवा, गॅस कनेक्शनची वेळच्यावेळी तपासणी केली जात नाही, गॅस वितरणाचे कार्यालय व गोदाम यांच्यापासून काही अंतरावर गॅस सिलेंडरची वाहने उभी करून विनाकारण वाहतुक खर्चाची वसुली केली जाते. अनेकदा गॅस सिलेंडर न भरताच मेसेज येतो तो गॅस कुणाला दिला जातो याची चौकशी व्हावी, सबसीडी बाबत प्रशासनाकडून खुलासा होत नसल्याने प्रत्यक्षात येणारी सबसीडी व ग्राहकांना न मिळणारी सबसीडी याची चौकशी कुणाकडे करायची ? अशा प्रकारच्या केवळ गॅस वितरणावर श्रीरामपूरचा ग्राहक दिन चांगलाच गाजला.
श्रीरामपूर तहसिल कार्यालयात प्रशासनाच्या वतीने प्रशासकीय इमारत येथे आयोजीत केलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात उपस्थीत ग्राहकांचा रोष केवळ गॅस वितरण प्रणाली व त्यातील त्रुटीवर प्रचंड गाजला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राहक मंचाचे चंद्रकांत कुलकर्णी हे होते तर ग्राहक मंचाचे कमलकिशोर मुंदडा, योगीराज चंद्रात्रे, किरण घोलप, अजीत राऊत, अनिता आहेर, पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी, अव्वल कारकुन नितीन गरगडे, क्लर्क योगेश खंडागळे व धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचीव रज्जाक पठाण आदि व्यासपिठावर उपस्थीत होते.

यावेळी लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष भागचंद नवगिरे यांनी गॅस एजन्सी बाबतच्या विविध तक्रारी मांडल्या. त्यात खाजगी गॅस एजन्सीज बरोबर सहकारी सोसायटीच्या गॅस एजन्सीला राजकीय वरदहस्त असल्याने संबधीत गॅस एजन्सीजच्या कर्मचार्‍यांकडून ही गॅस ग्राहकांची अडवणूक केली जाते. मागील प्रोसीडींगचे वाचन करून आमच्या तक्रारीवर काय कारवाई झाली याचा खुलासा मागीतला. हाच सुर पकडत अन्तोन शेळके यांनी मी जिल्हा पुरवठा कार्यालयात समक्ष लेखी तक्रार करून ही कारवाई होत नसल्याचे सांगीतले. धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचीव रज्जाक पठाण यांनी दररोज ग्राहक म्हणून येत असलेल्या अडचणी विषद केल्या. दर वेळी ग्राहक दिनात अनेक ग्राहक विविध एजन्सी विरूद्ध ग्राहकांकडून तक्रारी येतात पण कारवाई होत नाही, ग्राहक दिन हा केवळ औपचारीकता न राहता संबधीत एजन्सीना लागलीच लेखी कळवून खुलासा मागविला जाणे अपेक्षीत असते परंतू तसे घडत नाही अशी खंत पत्रकार चंद्रकांत झुरंगे यांनी व्यक्त केली. 
ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ग्राहक मंच व प्रवासी संघटनेच्या वतीने लवकरच ‘तक्रार निवारण समीती’ स्थापन करून दर महिण्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी ग्राहकांच्या लेखी तक्रारी घेवून त्यांचे निराकरण करण्यात येईल, त्या करीता लवकरच स्वतंत्र कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन करून या कार्यालयामार्फत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणार असल्याचे ग्राहक मंचाचे कमल किशोर मुंदडा यांनी सांगीतले. ग्राहक दिन साजरा करताना शासनाने परीपुर्ण नियोजन व्हावे तसेच सेवा देणार्‍या संस्थांना सक्तीने उपस्थीत रहाणे गरजेचे आहे, त्याच बरोबर ग्राहकांने सुद्धा कुठलीही वस्तू खरेदी करताना बिल घेणे अवाश्यक असल्याचे यावेळी ग्राहक मंचच्या अनिता आहरे यांनी सांगीतले.
पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांनी ग्राहकांच्या तक्रारींचे प्रोसीडींग लीहीण्यात आले असून संबधीतांना शासनाच्यावतीने लेखी कळवून खुलासा मागविण्यात येईल व त्या प्रमाणे पुढील ग्राहक दिनात खुलासा केला जाईल असे सांगीतले.
 सुत्र संचालन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचीव रज्जाक पठाण यांनी केले.
यावेळी माणिक जाधव, प्रकाश गदीया, वनराज ढाले, राजेंद्र वाघ, सागर पानसरे, विकी धाकतोडे, सद्दाम शेख, राजन वधवाणी, योगेश नागले, रवींद्र काळे, शुभम होले, अमोल आसकर, मनोज शिखरे, संदिप पारखे, सतीष मेटे, किशोर ठोकळ, शितल शिंदे, जयरी हेलकुटे, ज्योती गजभिव, आरती भोसले, मेघा रघतवन आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.
रेशन दुकान प्रमाणे गॅस

*एजन्सीला ही पॉज मशीन द्या - माणिक जाधव*
ग्राहकांची होत असलेली लुट थांबविण्यासाठी शासनाने गॅस एजन्सीच्या संबधीत प्रतिनिधींना व वितरण प्रतिनिधींना रेशन दुकानांप्रमाणे पॉझ मशीन देवून गॅस सिलेंड दिल्यानंतर संबधीत ग्राहकांचा थम्स घेतल्यास कुठलाच गैरप्रकार होणार नाही शिवाय प्रत्येक ग्राहकांला ऑन लाईनचे बिल मिळेल त्यामुळे ग्राहकांची लुट थांबेल अशी मागणी यावेळी माणीक जाधव यांनी केली.

*फोटो ओळ*
श्रीरामपूर तहसिल कार्यालय येथे आयोजीत ग्राहक दिन कार्यक्रमात तक्रारींचा खुलासा करताना पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी समवेत चंद्रकांत कुलकर्णी, कमलकिशोर मुंदडा, योगीराज चंद्रात्रे, किरण घोलप, अजीत राऊत, अनिता आहेर, नितीन गरगडे, योगेश खंडागळ, रज्जाक पठाण आदि दिसत आहेत.(छाया - चंद्रकांत झुरंगे) 
श्रीरामपूर तहसिल कार्यालय येथे आयोजीत ग्राहक दिन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ग्राहक मंचचे कमलकिशोर मुंदडा समवेत सुहास पुजारी, चंद्रकांत कुलकर्णी, कमलकिशोर मुंदडा, योगीराज चंद्रात्रे, किरण घोलप, अजीत राऊत, अनिता आहेर, नितीन गरगडे, योगेश खंडागळ, रज्जाक पठाण आदिसह उपस्थीत ग्राहक दिसत आहेत.

(छाया - चंद्रकांत झुरंगे)


*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close