shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कचरू महांकाळे यांना भूमी फाऊंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्रदान


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच कचरू महांकाळे यांना नुकताच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे भूमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या चतुर्थ वर्धापन दिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष प्रा.कैलास पवार,उद्योजक फत्तेचंद राका,भारतीय हवाई दल एयर मार्शल प्रदीप बापट,सिल्व्हर ग्रुप संचालक संतोष बारणे, उपसरपंच राहुल दातीर आदींच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 महांकाळवाडगांव सारख्या ग्रामीण भागात संस्थेच्या वतीने महिलांना शेळ्या वाटप,पाणी पुरवठा योजनासाठी सहकार्य, नागरिकांना रेशन कार्ड,संजय गांधी निराधार योजनासाठी मदत करणे,आदी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व सरपंचपदावर असताना गावात विविध विकासाची कामे केल्याबद्दल तथा केवळ सरपंच पदापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी नेहमी समाजसेवेचा वसा जोपासल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी :* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close