डाळज चौफुला या ठिकाणी भीषण अपघात: दोन तरुण गंभीर जखमी.
प्रा.सागर घरत.
भिगवण:
इंदापूर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास डाळज नं 2 या ठिकाणी दुचाकी(MH16DH8367) व किया(MH45AU2019)चारचाकी या वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील संतोष दादा पिसे (वय 31)
विनोद पांडुरंग पिसे (वय 24)
(दोघेही रा.येसवड़ी ता.कर्जत जि.अहमदनगर) हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सदरील दोघे तरुण हे आपल्या ताब्यातील दुचाकीवरून कळसमार्गे भिगवण कडे जाण्यासाठी निघालेले होते.त्यांची दुचाकी डाळज नं 2 या ठिकाणी सोलापूर पुणे महामार्गावर आली असता भरधाव वेगाने सोलापूर कडून पुणे दिशेने निघालेल्या चारचाकी गाडीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.या धडकेत दुचाकी जवळजवळ 50 ते 60 फूट लांब घसरत गेली.अपघाताचे वृत्त कळताच आपुलकीची सेवा रुग्ण वाहिका चालक केतन वाघ यांनी तात्काळ अपघात स्थळी जाऊन गंभीर जखमी युवकांना आपल्या रूग्ण वाहिके मधून पुढील उपचारासाठी भिगवण आयसीयु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहेत.

