एन. .ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही इंदापूर तालुक्यामध्ये खरोखरच उत्तम कार्य करते - केंद्रप्रमुख हगारे.
एन. .ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.
इंदापूर:- निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन. .ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे आज १६ .१..२०२४ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निमगाव बीट व निमसाखर केंद्राचे केंद्रप्रमुख बी .के .हागारे यांनी स्वीकारले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे उपस्थित होते.
त्यांच्यासमवेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, ग्रामस्थ नंदकुमार पवार हे देखील त्यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व शास्त्रज्ञांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील विज्ञान विभागाने व्यासपीठावरील प्रमुख अतिथींचे श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले.
त्यावेळी सौ स्वाती नगरे मॅडम यांनी आजची वैज्ञानिक परिस्थिती याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. व आपणा सर्व विद्यार्थ्यांमधूनच भविष्यामध्ये देशपातळीचा शास्त्रज्ञ जन्म घेऊ शकतो असेही मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले.
आज आपल्या विद्यालयांमध्ये एक सुंदरसा विज्ञान प्रदर्शन सोहळा आयोजित केलेल्या सर्व विज्ञान शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे सचिव आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धनंजय सूर्यकांत रणवरे भरभरून शुभेच्छा दिल्या.आपल्या विद्यालयाचा विकास होत असताना सर्व विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला पाहिजे, क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपण नावलौकिक मिळविला पाहिजे. व एकंदरीतच आपल्या संस्थेची विद्यालयाची दिवसेंदिवस
प्रगती झाली पाहिजे असे मत त्यावेळी सचिव रनवरे यांनी व्यक्त केले.
आई-वडिलांचे संस्कार ही काळाची गरज आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही मातोश्री आणि पिताश्रींच्यादर्शनाने झाली पाहिजे. आपली शाळा ही इंदापूर तालुक्यामध्ये खरोखरच उत्तम कार्य करत आहे. स्पर्धेत युगामध्ये निमसाखर हायस्कूल हे प्रथम दर्जा स्कूल ठरले पाहिजे असे मत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख हगारे यांनी व्यक्त केले. तसेच आपल्यासारखा उत्साह पाहून मला नक्कीच खात्री आहे की यातूनच भविष्यातील एखादा शास्त्रज्ञ बनू शकतो व निमसाखर हायस्कूलचे नाव देश पातळीवर नेऊ शकतो असे मत त्यावेळी हगारे यांनी व्यक्त केले.
त्यावेळी निमसाखर पंचक्रोशीतील विविध शाळा ,ग्रामस्थ ,पालक हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे, पर्यवेक्षक मधुकर खरात, तर कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रमुख चंद्रकांत बोंद्रे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी इतर विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल देवकाते सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. स्वप्नाली पाटील मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन हनुमंतराव तोडकर सर यांनी केले.

