खेड:-
गाडकवाडी ता.खेड जि. पुणे येथे दापोडी पुणे येथील श्रीमती.सी.के.गोयल कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ""विशेष श्रमसंस्कार शिबिरात" सामाजिक उपक्रमांतर्गत"महिला मेळावा"-महिलांसाठी उद्योजकता विकास, शिबीर/ शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन /आरोग्य जागृती शिबिर उत्साहात संपन्न झाला.
येथील श्रीमती सी.के.गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 'विशेष श्रमसंस्कार शिबिर" दिनांक १४जानेवारी ते 20 जानेवारी २०२४ या कालावधीत गाडकवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे.
या शिबिराचे उद्घाटन रविवार १४ जानेवारी 20२४ रोजी सायंकाळी ४:००वाजता संपन्न झाले.
शिबिरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम ग्रामस्थांसाठी राबविण्यातल आलेअसून त्यामध्ये "मकर संक्रांत "निमित्त सोमवार १५ जानेवारी २०२४रोजी दुपारी २;०० ते ४:०० या वेळेत गावातील महिलांसाठी "महिला मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी उद्योजकता विकास, शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन, व आरोग्य जागृती शिबिर करून हे शिबिर अतिशय उत्साहात संपन्न झाले.
राजगुरुनगर येथील "मुंबई माता बाल संगोपन केंद्र"यांच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर महिला मेळाव्यामध्ये 'मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या" संचालिका सौ. शर्मिली सांडभोर, शिंदे मॅडम, वाघोले मॅडम, यांनी महिला मेळाव्यामध्ये उपस्थित महिलांना शेतीपूरक व्यवसाय, उद्योजकता विकास, आणि आरोग्य जागृती या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळेस मार्गदर्शन करताना महिलांनी पुढे येऊन आपली प्रगती साधली पाहिजे, आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे ,आपल्या मुलांसाठी पोषक आहार पुरवला पाहिजे ,त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे ,व शेतीला जोडधंदे म्हणून दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिका पालन, गांडूळ खत निर्मिती या उद्योगांची माहिती, घेऊन त्यातून स्वयंरोजगार निर्माण करून स्वतःची प्रगती साधली पाहिजे असे मार्गदर्शन मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या संचलित व इतर मार्गदर्शकांनी केले.
"मकर संक्रांति "निमित्त या महिला मेळाव्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून, तिळगुळ वाटप केले. आणि अतिशय आनंदात महिला मेळावा संपन्न झाला.
सदर महिला मेळाव्यासाठी शंभरहून(१००) अधिक महिला व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची संयोजन :राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे यांनी केले. तर त्यांना प्रा. सिद्धार्थ कांबळे प्रा.वैभव वरडूले प्रा. शीला येलमेळी, लक्ष्मण कोहिणकर यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आभार :प्रा.शीला येलमेळी यांनी मानले.
विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा गायकवाड, काजल काटे, रत्नप्रभा मोरे ,यांनी मोलाचे सहकार्य केले.

