*लोकसेवा परिवार सामाजिक संस्था व छ.शिवाजी कॉलेजचा सामंजस्य करार*
*आदिवासी पारधी जमातीची, संस्कृती, भाषासाहित्य आणि शिक्षण विकास, विस्तारकार्यासाठी एकत्र*
सातारा प्रतिनिधी:
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा या महाविद्यालयाचा मराठी विभाग व लोकसेवा परिवार सामाजिक संस्था , अंगापूर यांनी ५ जानेवारी २०२४ रोजी आदिवासी पारधी जमातीच्या संस्कृती, भाषासाहित्य,व विकास कार्यक्रमासाठी सामंजस्य करार केला. लोकसेवा परिवार सामाजिक संस्था अंगापूर ही संस्था गेली २५ वर्षे अनुसूचित जमातीतील पारधी जमातीच्या उत्कर्ष व विकासासाठी काम करत आहे. या संस्थेतर्फे आरोग्य,शिक्षण ,स्वावलंबन आणि स्थैर्य या साठी पारधी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी काम करते. या संस्थेचा आस हा प्रकल्प सातारा जिल्ह्यात कार्यरत असून जिल्ह्यात आठ आठवडी शाळांच्या माध्यमातून १६० पारधी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने घेतलेली आहे. त्या मुलांना शाळाबाह्य होण्यापासून वाचविण्यासाठी व त्यांचे उच्च शिक्षण होण्यासाठी ,व त्यांची उन्नती होण्यासाठी काम करीत आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग हा मराठी भाषा संवर्धन , साहित्य , संशोधन ,इत्यादी विविध कार्यासाठी जोमाने काम करत आहे. पदवी,पदव्युत्तर स्तरावर मराठी विभागात अभ्यास व संशोधन केले जाते.
पीएच,डी.पदवीसाठीचे शिक्षणही विद्यार्थी घेत आहेत. अलीकडे भारतातील विविध बोलींचा अभ्यास करण्याची विभागाची मनीषा असून आदिवासी बोली भाषेचे जतन,संवर्धन व अभ्यास करण्यासाठी काम करायच्या उद्देशाने पारधी व अन्य अनुसूचित जमातीतील बोलीभाषेचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने व त्यांची संस्कृती अभ्यास करण्याच्या हेतूने लोकसेवा परिवार सामाजिक संस्था यांच्या सहयोगाने काम करण्याचे ठरविले आहे. याचसाठी या दोन्ही संस्थानी मिळून पारधी जमातीच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काम करायचे ठरविले आहे. आदिवासी भाषा व मराठी भाषा या संदर्भात दोन्ही संस्था मिळून कार्यक्रम घेणार आहेत. चर्चासत्र ,परिसंवाद ,कार्यशाळा ,साहित्य प्रकाशन समारंभ , साहित्य संमेलने निबंध स्पर्धा , वकतृत्व स्पर्धा .साहित्य लेखन , इत्यादी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आज छत्रपती शिवाजी कोलेजच्या प्राचार्य कक्षात दोन्ही संस्थाचे पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीस लोकसेवा परिवार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब इनामदार गुरुजी, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, संस्थापक संचालक माणिक शेडगे काका , शुभांगी शेडगे,अरविंद जाधव,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,प्रा.संदीप भुजबळ,भाग्यवान घाडगे,प्रा.डॉ.कांचन नलवडे,प्रा डॉ.विद्या नावडकर,प्रा.डॉ. संजयकुमार सरगडे ,प्रा.प्रियांका कुंभार,प्रा.श्रीकांत भोकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आपण एकत्र येऊन विविध उपक्रम सुरु करून काम गतिमान करण्याचे ठरवून करार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
डावीकडून भाग्यवान घाटगे , प्रा.संदीप भुजबळ ,अरविंद जाधव ,प्रा.डॉ.सुभाष वाघमारे , बाबासाहेब इनामदार गुरुजी, प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे , माणिक शेडगे काका ,शुभांगी शेडगे ,प्रा.डॉ.कांचन नलवडे , प्रा.डॉ.विद्या नावडकर ,प्रा. प्रियांका कुंभार ,प्रा.श्रीकांत भोकरे ,प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

