*खरंतर अहमदनगर जिल्ह्यातील आती दुर्गम समजल्या जाणाऱ्या तसेच संत कवी महिपती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या "ताहराबाद" या खेडे गावातून एक मुलगा वीस वर्षांपूर्वी कामानिमित्त गावातून बाहेर पडतो. दुष्काळ, गरिबी तसेच बेरोजगारी ही तर पाचवीलाच पुजलेली असते.
*हाताला काम नाही, पुरेसा पैसा नाही ही सर्व संकटे उराशी बाळगून पुढे कुठे जायचे ? काय करायचे ? याची पुसटशीही कल्पना नसताना देखील जीवनात काहीतरी करायचे ही जिद्द मनाशी धरून व काळजावर दगड ठेऊन गावातून बाहेर पडतो, आणि पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात जिथे कोणी आपल्या शेजारचा नाही, जिथे कोणी आपल्या नात्यातला नाही अशा ठिकाणी जातो.*
*दररोज नवीन चेहरे, दररोज नवीन समस्या या सगळ्यांशी दोन हात करत तोंड देत जीवनात कोणताही अनुभव नसतानाही स्वतःच्या कलेवर छोटी-मोठी नोकरी करू लागतो, परंतु खेड्यातील जिवन-शैलीशी एकरूप झालेला जेंव्हा शहरातील झगमगाटात येतो तेंव्हा मात्र सतत काहीतरी चुकल्या सारखं वाटत असतं. मन रमत नसतानाही परस्थिती डोळ्यासमोर ठेऊन जीवनातील प्रत्येक क्षणाशी सांगड घालत असतो.*
*अशातच एक जीवाभावाचा मित्र भेटतो व पुढे सुरू होते ती ऐतिहासिक शहर म्हणून समजल्या जाणाऱ्या सातारा शहराच्या सातारा वारीला. याच सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर सारख्या शहरात नोकरीचा पाया रोवला जातो व याच नोकरीच्या जीवावर "Journalism" सारखा कोर्स करुन पुढे समाज कार्याची आवड निर्माण होते.*
*खरंतर जीवनात 'कुणाला फसवायचे नाही' कुणाला लुबाडायचे नाही' स्वार्थासाठी कुणाशी खोटे बोलयाचे नाही' ही शिकवण आई-वडिलांकडूनच आलेली असते.*
*याच शिकवणीच्या जोरावरती निर्माण होते ती भल्या-भल्यांना झुकवण्याची ताकत. हळू हळू नाव मोठे होऊ लागते व पुढे भ्रष्टाचारी तसेच अवैध्य जगतात 'शरद झावरे' या नावाचा उदय होतो.*
*गोरगरिबांना न्याय मिळवुन देणे, अनेक भ्रष्टाचार बाहेर काढणे तसेच अवैध धंद्यांवर प्रखडपणे मते मांडणे या सर्व गोष्टींमुळे कुठलीही सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी नसताना तयार होते ती 'शरद झावरे' या नावाची ओळख.
*आजवर अनेक पुरस्कार आपणास मिळाले तरीदेखील आपल्या या निःपक्ष व निर्भीड भूमिकेची दखल घेत आम्हाला अपणास "जनसेवक पुरस्कार २०२३" देताना हृदय भरून येत आहे व गौरान्वीत होत आहे.*
*आपणास या पुढील वाटचालीसाठी "दुर्गा ग्रूप महाराष्ट्र राज्य" यांच्याकडून खुप-खुप शुभेच्छा !!*
दुर्गा ग्रूप, महाराष्ट्र राज्य

