shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसृष्टीचे संपादक धनंजय कळमकर यांनी पन्नास ऊसतोड मुजरांसोबत साजरा केला अभिष्टचिंतन सोहळा


उसतोडणी मजूरांना ऊबदार कपडे ' साडया व खाऊ वाटप करत स्तुत्य उपक्रम राबवला 

 मजूरांची आरोग्य तपासणी; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

इंदापूर प्रतिनिधी 
इंदापूर तालुक्यातील गेली २५ वर्षे पत्रकार क्षेत्रात काम करणारे, निर्भीड लेखणीचा बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे असे व शिवसृष्टी साप्ताहिकचे संपादक धनंजयराव कळमकर यांचा अभिष्टचिंतन  दिनांक ५ जानेवारी रोजी मौजे. इंदापूर या गावांमध्ये पांडुरंग वामन निगडे यांच्या शेतात ऊसतोड मजुराच्या सोबत साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील अनेक भागातील इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाचे पत्रकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ऊसतोड मजुरांना उबदार कपडे , महिलांना साडी, पुरुषांना कपडे,लहान मुलांना ही स्वेटर ,कपडे,चॉकलेट ,बिस्कीट, केक,नाष्टा वाटप करण्यात आला . लहान मुलांना केक, चॉकलेट देताचं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता.

महिलांना साडी ,लहान मुलांना स्वेटर ,मोठ्या व्यक्तींना कपडे  वाटप करण्यात आले. त्यानंतर सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. इंदापूर मध्ये दिवसभर अभिष्टचिंतन दिनानिमित्त इंदापूर तहसील कार्यालयातील अधिकारी,कृषी विभागातील अधिकारी,वीजमंडळाचे अधिकारी , पोलिस अधिकारी, पंचायत समिती अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा तर काहींनी भ्रमणध्वनी , सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.तसेच दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल राहिली. अनेक ठिकाणी सत्कार, आजी, माजी मंत्री,आमदार, खासदार विविध राजकीय पक्षाचे नेते, अध्यक्ष , सामाजिक संस्था यांनी शुभेच्छा दिल्या.


*युवा पिढीला आदर्शवत अभिष्टचिंतन सोहळा - सामाजिक कार्यकर्ते धरमचंद लोढा


सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध उद्योजक, व्यापारी धरमचंद लोढा म्हणाले की, गेली २५ वर्ष  पत्रकार क्षेत्रात काम करणारे, शिवसृष्टी साप्ताहिकचे संपादक धनंजयराव कळमकर यांनी अनाठायी खर्च टाळून ऊसतोड मजुरांच्या सोबत वाढदिवस, अभिष्टचिंतन साजरा करणे हे आताच्या युवा पिढीला व नागरिकांनी आदर्शवत आहे .अभिष्टचिंतन सोहळा अनेक मी माझ्या जीवनात पाहिले  पण हा आगळावेगळा अभिष्टचिंतन सोहळा आज पाह्यला मिळाला आहे मी माझ्याही नातीचा, मुलींचा असाच अभिष्टचिंतन साजरा केला.


*माझ्या सामाजिक जीवनात पहिल्यांदाच आगळावेगळा अभिष्टचिंतन सोहळा पाहिला- अनिताताई खरात

मरावे परी किर्ती रुपी उरावे |या संत वचनाप्रमाणे आज अभिष्टचिंतन दिनानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक, अध्यक्ष अनिताताई खरात म्हणाला की, मी लहानपणापासून आतापर्यंतच्या सामाजिक जीवनामध्ये असा आगळावेगळा, गोरगरीब सामान्य मजुरांसोबत अभिष्टचिंतन साजरा करताना, त्यांच्याबरोबर भोजन करणे, त्यांच्या सोबत अभिष्टचिंतन साजरा करताना ,विविध प्रकारच्या वस्तू देणे, त्यांचे आरोग्य तपासणी करणे, एक नाविन्यपूर्ण अभिष्टचिंतन पाहिल्यावर मन भरून आल्यासारखं वाटले. आम्ही सुद्धा या पद्धतीचे इथून पुढे वाढदिवस अभिष्टचिंतन असेच साजरी करू आणि लोकांना साजरे करण्यास आहवान करू.


*गेली  २० ते २५ वर्ष जे पत्रकार क्षेत्रात पेरले ते ह्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आशीर्वाद रुपी मिळाले- धनंजयराव कळमकर

अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने आभार व्यक्त करताना शिवसृष्टी साप्ताहिकचे संपादक धनंजयराव कळमकर म्हणाले की, गेली २० ते २५ वर्षे पत्रकार पत्रकार  क्षेत्रात काम करतोय, सर्वसामान्य जनतेच्या  व्यथा निर्भीड आणि निरपेक्ष बातमीच्या द्वारे समस्या मांडत असताना जे गेले २० ते २५ वर्षे मी माझ्या पत्रकार लेखणीच्या रूपात जे पेरले ते आज अभिष्टचिंतन दिनानिमित्त आशीर्वाद रुपी मिळाले आहे.खरी तर आज स्व. लक्ष्मी वैभव  साप्ताहिकचे संपादक , सेवानिवृत्त सैनिक, विलासराव गाढवे यांची आज कमी जाणवते. गेली कित्येक वर्ष मोठ्या भावाप्रमाणे वडीलाप्रमाणे सदैव पाटीवर आशीर्वाद रुपी असणारे  हात तो हाताची आज कमी जाणवत आहे. त्यांच्या शिवाय मला अभिष्टचिंतन सोहळा साजरा करावा लागत आहे. प्रत्येक गोष्ट एकसारखी जीवनात आम्ही साजरी केली व घेतली आज माझा अभिष्टचिंतन सोहळा सर्वसामान्य ऊसतोड मजुरांच्या सोबत करायचा योजना माझे जिवलग मित्र इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया इंदापूर तालुका प्रतिनिधी पत्रकार कैलास पवार,  सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार , कवी महादेव चव्हाण सरांनी ही संकल्प मांडली आणि ती सत्यात उतरवली . मी आयुष्यभर यात ऋणी असणार आहे अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरनी सर्व मजुरांची तपासणी केली याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिथे प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या जात होत्या तेथे ऊसतोड मजुरांच्या सोबत अभिष्टचिंतन सोहळा चर्चा केली जात होती.सर्व सामान्य माणसाला व पत्रकार सहकारी असो किंवा पदाधिकारी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत,चुकला की,आपला असो की,तुपला असो माफी नाही...जो येईल त्यांच्या सोबत,जो नाही येईल त्यांच्या विना काम करण्याची पद्धत यामुळे पत्रकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पत्रकार क्षेत्रातील  सडेतोड लेखणीचा बादशाह शिवसृष्टीचे संपादक धनंजयराव कळमकर यांनी पन्नास ऊसतोड मुजरांसोबत आपला अभिष्टचिंतन दिन साजरा करताना 
close