shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवसह्याद्री राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे सिंहगडावर सफाई अभियान.

पुणे:- गड किल्ले संवर्धन योजनेअंतर्गत नवसह्याद्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एकक यांनी किल्ले सिंहगड येथे साफसफाई व जनजागृती केली.

यावेळी  विद्यार्थ्यांनी सिंहगडावर प्लॅस्टिकच्या पिशव्या व रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यांची विल्हेवाट लावली.

यावेळी संगणक विभाग द्वितीय वर्षाचा विद्यार्थी दर्पण तळेकर याने पोवाडे गात जनजागृती केली, तर काही विद्यार्थांनी लोकांशी संवाद साधून त्यांना गड किल्ले संवर्धनाचे महत्व सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, संचालक सागर सुके, संचालिका प्रा. सायली सुके, प्रा. सानवी सुके, प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर चव्हाण व रासेयो सहाय्यक ओंकार देशमुख यांनी केले.
close