गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे कायद्यानुसार गुन्हा; हेल्पलाईन क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन
अहमदनगर प्रतिनिधी:
गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य होताना आढळल्यास १८००२३३४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक,अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
तक्रारीची खातरजमा करुन न्यायालयात गुन्हा दा
खल झाल्यास शासनाच्या खबऱ्या बक्षीस योजनेंतर्गत माहिती देणाऱ्यास एक लक्ष रुपयांपर्यंत बक्षिस देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*

