shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नमो चषक केज 2024 च्या विजयाचा मानकरी आशियाना क्रिकेट संघ अंबाजोगाई तर उपविजेता MCC क्रिकेट संघ केज..


::::;;:::::::::::::::::::::::::::::     
युवकांनी मोबाईल मधील खेळ खेळण्या ऐवजी मैदानी खेळ खळावेत: नंदकिशोर मुंदडा!!                                

प्रकाश मुंडे  / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
         
नमो चषक केज 2024 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी बीड जिल्ह्यच्या दबंग खा.प्रीतमताई मुंडे व आ नामिताताई मुंदडा  यांच्या हस्ते करण्यात आले होते त्याच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज दि:03 जानेवारी दुपारी 05 वा भाजपाचे जेष्ट नेते नंदकिशोर मुंदडा(काकाजी) यांच्या हस्ते करण्यात आला. 
         

या वेळी बोलताना काकाजी यांनी सांगितलं की युवकांनी मोबाईल मधील खेळ न खेळता मैदानी खेळ खेळावेत जेणे करून आपलं आरोग्य चांगले राहील व केज विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून शालेय  विद्यार्थी, युवक, युवती ,महिला यांना व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच काम आ. नामिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून उपलब्ध करू व खेळाडूंना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देऊ तसेच केज तालुक्यात लवकरच अद्यावत व सर्व सुविधा असणारे  क्रीडा संकुल तयार करू जेणे करून नवीन खेळाडू तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
            

तसेच त्यांनी नमो चषक 2024 साठी ज्या संयोजक समितीने गेली 15 दिवस योगदान दिले आशा सर्व सदस्यांचा सन्मान केला त्यांच अभिनंदन केले. त्यामध्ये स्पर्धेचे समन्वयक उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर ,सुरेश नांदे सर, विकास गवळी,प्रा विनोद गुंड,प्रकाश मुंडे, विजय वनवे, किरण सारूक, स्वप्निल चाटे, सुनील माने,यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट आसे नियोजन केले होते.                    

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान आशियाना क्रिकेट संघाचा हसन लाला,स्पर्धेतील  उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील चाटे,उत्कृष्ट गोलंदाज लायक,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋषी कदम, स्पर्धेत हॅट्रिक घेणारा गोलंदाज पवन चाटे या खेळाडूंना रोख पारितोषिक व ट्रॅफि देऊन सन्मान करण्यात आला.
   
या कार्यक्रमास उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर,भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार,व्यापारी महासंघाचे  अध्यक्ष महादेव सूर्यवंशी,केज तालुका क्रीडा समन्वयक प्रा विनोद गुंड सर,सुरेश नांदे, प्रकाश मुंडे,सुनील घोळवे,विजय वनवे, डॉ वायबासे ,चंदू मिसळ, सुनील सिरसाट, दत्ता सावंत, खदीर कुरेशी, संतोष जाधव,विकास शिंदे,हे उपस्थित होते सामन्याचे पंच म्हणून सुनील पाटील व विनोद नरवडे यांनी काम पाहिले तर संपूर्ण स्पर्धेचे समालोचन पांडुरंग महाराज आंधळे पंढरपूरकर यांनी केले. शेवटी नमो चषक 2024 साठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार स्पर्धेचे समन्वयक उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर यांनी मानले .
close